शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विजेचा ‘स्थिर आकार दर’ वर्षभरात दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:25 IST

वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार वीज वितरण कंपनीने वीजबिलाच्या स्थिर आकारात वाढ केली आहे. ही वाढ वर्षभरात तीन वेळा झाली आहे. यात विविध गटात ५० ते ८८ टक्के वाढ झाली आहे. २०२० पर्यंत स्थिर आकार दरात वाढ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्राहकांना भुर्दंड : नियामक आयोगाने वर्षभरात केली तीन वेळा वाढ, आणखी दोन वर्षे वाढीचे संकेत

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार वीज वितरण कंपनीने वीजबिलाच्या स्थिर आकारात वाढ केली आहे. ही वाढ वर्षभरात तीन वेळा झाली आहे. यात विविध गटात ५० ते ८८ टक्के वाढ झाली आहे. २०२० पर्यंत स्थिर आकार दरात वाढ करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे.कोळशाचा तुटवडा, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती यामुळे ट्रान्सपोर्टचे वाढलेले दर, वीज गळती याचा परिणाम वीज निर्मितीवर झाला आहे. वीज नियामक आयोगाने स्थिर आकारात वाढ सूचविली आहे. २०१६ ते २०२० पर्यंत चार टप्प्यात विजेची दरवाढ होणार आहे. यावर्षी तीन वेळा विविध गटातील स्थिर आकार दरात वाढ झाली आहे. मार्च २०१७ मध्ये स्थिर आकार दर ५५ रूपये होता. मार्च २०१८ मध्ये घरगुती ग्राहकांचा स्थिर आकार दर ६० रूपये झाला. एप्रिलमध्ये ६५ रूपये, सप्टेंबरमध्ये ८० रूपये करण्यात आला. हे वाढीव दर आॅक्टोबरच्या बिलात लावून आले आहेत. अशा पद्धतीने घरगुती थ्री फेज आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या बिलात वाढ झाली.घरगुती थ्री फेज ग्राहकांचा मार्च १८ मधील स्थिर आकर दर १७० रूपये होता. एप्रिलमध्ये १८५ रूपये, सप्टेंबरमध्ये ३०० रूपये करण्यात आला. वाणिज्यिक ग्राहकांचा मार्च १८ मध्ये स्थिर आकार दर २५० रूपये होता. एप्रिलमध्ये २७० रूपये, सप्टेंबरमध्ये ३५० रूपयांवर पोहचला. एप्रिल २०१९ मध्ये आयोगाने आणखी वाढ सूचविली आहे. यातून वीज कंपनी विविध दुरूस्तीचे काम हाती घेणार आहे. मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या वीज बिलात वाढीव रकमा येणार आहे.बिलाच्या युनिटचे दर वाढलेवीजबिलाच्या युनिटमध्ये वाढ करण्यासाठी एमईआरसीने प्रथम सुनावणी घेतली. सप्टेंबरला त्याची अंमलबजावणी सुरू केली. आॅक्टोबरला हे वाढीव बिल लावून आले. यामध्ये युनिटला २२ ते २४ पैशांची वाढ नोंदविण्यात आली. यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात वाढ झाली आहे. ही वाढ यापुढेही कायम राहण्याची शक्यता असल्याने वीज ग्राहक संघटना आक्रमक पवित्र्यात आहे.२०० युनिटचा स्पॅन तूर्त नाहीवीजबिलाचे धोरण ठरविताना ० ते १०० आणि १०० ते ३०० युनिटचा एक स्पॅन हा नियम बदलवावा. त्याऐवजी १०० ते २०० युनिट असा स्पॅन तयार करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केली आहे. हा विषय एमईआरसीपुढे ठेवण्यात आला. त्यावर अमरावती आणि नागपुरात सुनावणी झाली. मात्र कुठलाही निर्णय झाला नाही.

टॅग्स :electricityवीज