नरेश मानकर पांढरकवडाहद्दवाढीमुळे येथील नगरपरिषदेच्या वाढलेल्या दोन जागांसाठी येत्या २२ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे़ त्यामुळे निवडणुक आयोगाने आज गुरूवारपासून आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीमुळे नगरपरिषदेची सदस्य संख्या आता १७ व्वरून १९ जाणार आहे़येथील प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये प्रत्येकी एक, अशा दोन जागांसाठी ही निवडणूक होणार आहे़ सध्या प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये प्रत्येकी चार सदस्य आहे. निवडणुकीनंतर ही संख्या वाढून प्रत्येकी अपाच होणार आहे. प्रभाग क्रमांक १ मधून अनुसूचीत जातीची महिला सदस्य निवडून द्यावयाची असून प्रभाग क्रमांक २ मधून अनुसूचीत जमातीचा उमेदवार निवडून द्यावयाचा आहे़सध्या १७ सदस्यीय नगरपरिषदेत काँग्रेसचे ११, पारवेकर गटाचे दोन व तिवारी गटाचे चार सदस्य आहेत़ २०१२ मध्ये झालेली नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस व पारवेकर गटाने युती करुन लढविली होती़ त्यावेळी अण्णासाहेब पारवेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते़ त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. त्यामुळे नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे बदलतील, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज होता़ तथापि नगरपरिषदेच्या राजकीय समीकरणात अद्याप कोणताही बदल झाला नाही़आता दोन नवीन सदस्य निवडून द्यावयासाठी होत असलेल्या या निवडणुकीत काँग्रेस व पारवेकर गटात युती होते, की काँग्रेस व पारवेकर गट (भाजप) ही निवडणूक स्वबळावर लढवितात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे़ प्रभाग क्रमांक एक हा विद्यमान नगराध्यक्ष शंकर बडे यांचा प्रभाग आहे़ या प्रभागातील चार सदस्यांपैकी नगराध्यक्ष बडे, पूजा मनोज भोयर व भाउराव किसन मरापे हे तीन सदस्य काँग्रेसचे आहे. सुनंदा मनोज देशमुख या महिला सदस्य पारवेकर गटाच्या आहेत़ आता पाचवा सदस्य कुणाचा राहील?, कॉग्रेस व पारवेकर गटात युती होते, की बदललेल्या परिस्थितीत स्वतंत्रपणे निवडणूक लढविली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. हा प्रभाग नगराध्यक्षांचा असल्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे़प्रभाग क्रमांक दोनमध्ये साजीद शरीफ, अनिल भगवान बोरेले, वंदना मनोज भोयर व दीपाली दीपक नक्षणे हे चारही सदस्य काँग्रेसचे आहेत़ या प्रभागात पाचव्या सदस्यासाठी निवडणूक होत असून पाचवा सदस्य कुणाचा राहील याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे़ मात्र या दोन सदस्यांच्या निवडीनंतरही पालिकेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाहीे.
दोन जागांसाठी निवडणूक
By admin | Updated: March 20, 2015 02:02 IST