शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’मध्ये आठ हजार महिलांची सुरक्षित प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 21:58 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत तब्बल आठ हजार ३६ महिलांची सुरक्षित प्रसूती झाली.

ठळक मुद्देमातामृत्यू दरात घट : १५०० महिलांवर सीझर शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत तब्बल आठ हजार ३६ महिलांची सुरक्षित प्रसूती झाली. यावरून मेडिकलच्या माता मृत्यू दरात घट झाल्याचे दिसून येते.सप्टेंबरपर्यंत झालेल्या एकूण प्रसूतीपैकी केवळ एक हजार ५२५ महिलांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. यात ‘इलामशिया’ या गंभीर आजाराच्या २५ महिलांची सुखरूप प्रसूती करण्यात आली. शासकीय रूग्णालयात जिल्हातूनच नव्हे, तर लगतच्या तेलंगणातील महिला प्रसूतीसाठी येतात. खासगी रूग्णालयात प्रसूतीदरम्यान प्रकृती गंभीर झालेल्या महिलांनादेखील ऐनवेळी शासकीय रूग्णालयाचाच रस्ता दाखविला जातो. येथे महिलांची धोकादाय स्थितीतून सुखरूप प्रसूती केली जाते.शासकीय रूग्णालयात नोव्हेंबर २०१६ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत तब्बल आठ हजार ३६ महिलांची प्रसूती झाली. यात एक हजार ५२५ महिलांचे सिझर झाले. ३२८ महिलांवर गर्भ पिशवी शस्त्रक्रिया करण्यात आली. मागील तीन महिन्यात रूग्णालयात सातपेक्षा कमी हिमोग्लोबीन असलेल्या १५९ गर्भवती महिला दाखल झाल्या. यापैकी केवळ तीन महिलांचा मृत्यू झाला, तर उर्वरित सर्व महिलांची रक्त देऊन अत्यंत क्लिष्ट स्थितीत यशस्वी प्रसूती करण्यात आली.ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणीही प्रसूती केली जाते. मात्र बहुतांश ठिकाणी आवश्यक त्या सोयी उपलब्ध नाहीत. अशावेळी संबंधित डॉक्टरांकडून जोखीम स्वीकारली जात नाही. त्यामुळे जिल्हास्थळावरील रुग्णालयात प्रसूतीसाठीची गर्दी वाढते. याही स्थितीत सुरक्षित प्रसूती केली जाते.‘इलामशिया’ महिलांचे सुरक्षित बाळंतपण‘इलामशिया’ हा गर्भवती महिलांना होणारा गंभीर आजार आहे. यात गरोदरपणात प्रचंड रक्तदाब वाढतो. प्रसंगी गर्भवती बेशुद्ध होतात. अथवा त्यांना सारखे झटके येतात. अशा महिलांची प्रसूती खासगी डॉक्टर आपल्या रूग्णालयात अपवादानेच करण्याची रीस्क घेतात. बहुतांश महिलांना शासकीय रूग्णालयातच पाठविले जाते. गेल्या तीन महिन्यांत हा आजार असलेल्या २९ महिला दाखल झाला. त्यांची सुरक्षित प्रसूती होऊन आता त्या ठणठणीत बºया झाल्या. मेडिकलच्या स्त्री रोग विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. श्रीकांत वºहाडे यांच्या मार्गदर्शनात सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ व कनिष्ठ वैद्यकीय अधिकाºयांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.