शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार करदात्या शेतकऱ्यांचा पेन्शन परतीच्या नोटिशीला ठेंगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 05:00 IST

आयकर विभागाने तपासली असता यामध्ये आयकर भरणारे श्रीमंत व्यक्ती आणि मोठ्या पगारावरील व्यक्तींचा समावेश असल्याची बाब उघड झाली. अशा अपात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. जिल्ह्यामध्ये दहा हजार १७० अपात्र शेतकरी आहे. ज्यांच्याकडून जमा झालेली रक्कम परत करण्याच्या सूचना तहसील प्रशासनाने दिल्या आहे. यातील एक कोटी ८७ लाख सहा हजार रुपयांची रक्कम गोळा झाली आहे. अद्याप ८८९६ शेतकऱ्यांनी ही रक्कम परत केली नाही.

ठळक मुद्देएक कोटीची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान धन योजनेत श्रीमंत आणि आयकर भरणारे दहा हजार १७० शेतकरी समाविष्ट झाले आहे. अशा शेतकऱ्यांना पैसे परत करण्याची नोटीस बजावली आहे. यातील आठ हजार शेतकऱ्यांनी नोटिशीला ठेंगा दाखविला आहे.जिल्ह्यामध्ये तीन लाख ३५ हजार ७७ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला. मिळणारा लाभ पाहून काही श्रीमंत व्यक्तींनी योजना मिळविण्यासाठी यादीमध्ये नाव टाकले आहे. ही यादी आयकर विभागाने तपासली असता यामध्ये आयकर भरणारे श्रीमंत व्यक्ती आणि मोठ्या पगारावरील व्यक्तींचा समावेश असल्याची बाब उघड झाली. अशा अपात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. जिल्ह्यामध्ये दहा हजार १७० अपात्र शेतकरी आहे. ज्यांच्याकडून जमा झालेली रक्कम परत करण्याच्या सूचना तहसील प्रशासनाने दिल्या आहे. यातील एक कोटी ८७ लाख सहा हजार रुपयांची रक्कम गोळा झाली आहे. अद्याप ८८९६ शेतकऱ्यांनी ही रक्कम परत केली नाही.

आतापर्यंत एक कोटीची वसुली- पंतप्रधान सन्मान धन योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन टप्प्यांत देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी धनदांडग्यांनी आपले नाव योजनेत दाखल केले.  - आयकर विभागाने अशा धनदांडग्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने पाठविलेल्या यादीतील दहा हजार १७० शेतकरी अपात्र आहेत.- अशा धनदांडग्यांकडून मिळालेली रक्कम परत घेण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहे. यातील १२७४ शेतकऱ्यांनी आतापर्यंत एक कोटी ८७ लाख सहा हजार रुपये परत केले आहे.

लाभ न मिळालेल्यांचा आकडा गुलदस्त्यात

जिल्ह्यामधील तीन लाख ३५ हजार ७७ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील काही शेतकरी विविध अडचणींमुळे योजनेत सहभागी झाले नाही अशा शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला जावा म्हणून शासकीय यंत्रणेकडे वारंवार येरझाऱ्या मारल्या. यानंतरही त्यांची नावे समाविष्ट झाली नाही. जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांचा आकडा सध्या तरी गुलदस्त्यात आहे. अनेकांना आपली नावे दाखल कशी करायची, याचीच माहिती नाही. यातून अडचणी वाढल्या आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी पात्र नसतानाही योजनेत लाभ घेतला अशा शेतकऱ्यांना तहसील प्रशासनामार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी मिळालेली रक्कम परत केली आहे, तर अनेकांकडून ही रक्कम यायची आहे. याबाबत पुढे काय कारवाई करायची, याच्या सूचना प्राप्त व्हायच्या आहे. वसुलीची प्रक्रिया स्थानिक पातळीवरून होत आहे.- ललितकुमार वऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी