शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गर्भाशयातून काढला आठ किलो मांसाचा गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

मागील सात महिन्यांपासून तिला पोटदुखीचा त्रास होत होता. स्त्रीरोग तज्ज्ञांनी तिच्या गर्भाशयाची व पोटाची चाचणी केली. सिटी स्कॅनच्या अहवालामध्ये महिलेच्या पोटात मोठा गोळा असल्याचे आढळून आले. हा गोळा ओटीपोटापासून थेट बरगड्यांपर्यंत वाढला असल्याचे निदान झाले. इतक्या मोठ्या वजनाचा व आकाराचा गोळा पहिल्यांदाच महिलेच्या पोटात असल्याचे आढळून आले. ही बाब आव्हानात्मक वाटल्याने या महिलेला सेवाग्राम येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर महिलेच्या जीवाला धोका असल्याचे कारण सांगून शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. ती महिला परत मेडिकलमध्ये आली.

ठळक मुद्दे‘मेडिकल’मध्ये शस्त्रक्रिया : असह्य वेदनेतून महिलेची केली सुखरूप सुटका, तीन तास चालली शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एखाद्या महिलेच्या पोटातून अनावश्यक मांसाचा गोळा बाहेर काढण्याच्या अनेक शस्त्रक्रिया होतात. मात्र यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विश्वास बसणार नाही एवढ्या वजनाचा गोळा महिलेच्या गर्भाशयातून काढण्यात आला. तब्बल आठ किलो वजनाचा मांसाचा गोळा तयार झाल्याने ही महिला असह्य वेदनेने तडफडत होती. या दुखण्यातून तिची डॉक्टरांनी सुखरूप सुटका केली.संगीता पांडुरंग डोंगरे (४०) रा.कोसरी ता.मारेगाव या महिलेला पोटात असह्य दुखणे होते. ती १४ डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली. मागील सात महिन्यांपासून तिला पोटदुखीचा त्रास होत होता. स्त्रीरोग तज्ज्ञांनी तिच्या गर्भाशयाची व पोटाची चाचणी केली. सिटी स्कॅनच्या अहवालामध्ये महिलेच्या पोटात मोठा गोळा असल्याचे आढळून आले. हा गोळा ओटीपोटापासून थेट बरगड्यांपर्यंत वाढला असल्याचे निदान झाले. इतक्या मोठ्या वजनाचा व आकाराचा गोळा पहिल्यांदाच महिलेच्या पोटात असल्याचे आढळून आले. ही बाब आव्हानात्मक वाटल्याने या महिलेला सेवाग्राम येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर महिलेच्या जीवाला धोका असल्याचे कारण सांगून शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. ती महिला परत मेडिकलमध्ये आली.यवतमाळ मेडिकलमध्ये शल्य चिकित्सा शास्त्र विभागात तिने तपासणी केली. तिला २० डिसेंबर रोजी विविध तपासण्या करून शस्त्रक्रियेसाठी आॅपरेशन थिएटरमध्ये घेण्यात आले. दुप्पट आकारमानाचा गोळा असल्याने अनेक धोके संभावत होते. शस्त्रक्रिया विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय पोटे व त्यांच्या टीममधील डॉ. विजय कनाके, डॉ. मनिष प्रजापती, डॉ. भूषण ठाकरे, डॉ. सुमेश डोईफोडे, डॉ. शरद जाधव, डॉ. मृणाल काकडे, डॉ. नागेश उंदरे, डॉ. सांकेत मुंधडा, डॉ. प्रतीक्षा जोशी, डॉ. नागेश अमानकर यांनी शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला. इतक्या मोठ्या प्रमाणात पोटात गोळा असल्याने शस्त्रक्रियेसाठी अ‍ॅनेस्थिशिया देण्याचे आव्हान होते. विभाग प्रमुख डॉ. दामोधर पटवर्धन यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कौशल्यपूर्णरित्या त्या महिलेला अ‍ॅनेस्थिशिया देण्याचे काम केले. यात त्यांना डॉ. रोशन शेंडे, डॉ. भूषण अंबारे, डॉ. विनय धकाते, डॉ. शीतल मानकर, डॉ. अजिंक्य वानोरे यांनी सहकार्य केले. तब्बल दीड तास परिश्रम करून ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. आता तीन दिवसात या महिलेच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा आहे. सात महिन्यांपासून असह्य वेदनेने तडफणाऱ्या महिलेला खऱ्या अर्थाने जीवनदान मिळाले. तिने येथील डॉक्टरांचे लाख-लाख धन्यवाद मानले. या शस्त्रक्रियेसाठी परिचारिका मीनाक्षी डाखोले, रंजनी बोमले, वंदना जमनारे, स्नेहा झाडे, छाया मोरे, स्वाती रोडे, वॉर्डबॉय पुरुषोत्तम देवतळे यांनी मदत केली. शस्त्रक्रियेनंतरही या महिलेची विशेष काळजीपूर्वक सुश्रृषा केली जात आहे. यामुळेच तिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याचे दिसते. या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार व शल्यचिकित्सा शास्त्र (सर्जरी) विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश जतकर यांनी सर्वांचेच कौतुक केले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल