शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्याची होणार आर्थिक गणना; घरोघरी जाऊन घेणार माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:46 IST

उद्योग, व्यवसायासह घरोघरी भेटी देणार: जिल्हा व तालुका स्तरावर समिती स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्याची २०२५-२६ ची आर्थिक गणना करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समन्वय समितीचे स्थापन करण्यात आले आहे. या समित्यांकडून जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायासह घरोघरी जाऊन कुटुंबांना भेटी देऊन आर्थिक गणना केली जाणार आहे.

केंद्र शासनातर्फे २०२५-२६ ची राष्ट्रव्यापी आठवी आर्थिक गणना केली जाणार आहे. त्यासाठी नियोजन विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, तर तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये जिल्हा स्तरावरील समन्वय समितीला गणनेची उद्दिष्टे, व्याप्ती आणि कार्यपद्धतीचा आढावा घेणे. गणनेच्या क्षेत्र कामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरिता आराखडा तयार करावा लागणार आहे. प्रगणक, पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या निश्चित करणे, गणनेचे सर्व भागधारक जिल्हा, तालुका, नागरी, ग्रामीण पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांचे संबंधित अधिकारी, प्रगणक व पर्यवेक्षक यांच्यापर्यंत माहिती आणि मार्गदर्शक सूचनांचा प्रसार जिल्हा समितीच करणार आहे.

प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी क्षेत्रकामाची कालमर्यादा आणि अंमलबजावणी धोरण निश्चित करणे, तालुकास्तरीय समितीला मार्गदर्शन करणे व आवश्यक निर्देश देणे, अशा सूचना समितीला देण्यात आल्या आहे. आर्थिक गणनेतून जिल्ह्यातील उद्योगातील गुंतवणूक, कुटुंबांचे उत्पन्न, आदी बाबी समोर येणार आहे.

१८ व ९ सदस्यीय समिती

  • जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समन्वय समितीत एकूण १८ सदस्य असणार आहे. त्यात सह अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
  • तालुकास्तरीय समन्वय समिती एकूण नऊ सदस्य असून, अध्यक्ष उपविभागीय अधिकारी, तर सह अध्यक्ष म्हणून तहसीलदार काम पाहणार आहे. 
  • जिल्ह्याच्या विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी तसेच प्रत्येक कुटुंबाचे दरडोई उत्पन्न काय याचा सांखिकीय डाटा गोळा करण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे.

तालुकास्तरीय समितीवर धुरा आर्थिक गणनेचा कार्यक्रम विहित कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी तालुका- स्तरीय समितीची राहणार आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणे आणि पर्यवे क्षकांच्या कामाची तपासणी तालुका समन्वय समितीलाच करावी लागणार आहे. तसेच जिल्हा स्तरीय समितीच्या सूचने- नुसार पुढील कार्यवाही करावी लागणार आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ