शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यातील रस्त्यांना ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 21:36 IST

आयुष्यभर वनसंपदा आणि वन्यप्राण्यांवर जीवापाड प्रेम करूनही पैनगंगा अभयारण्यातही आदिवासी बांधवांच्या नशिबी खरतड रस्तेच आहेत. अभयारण्याच्या जाचक अटींमुळे बंदीभागातील रस्त्यांची डागडुजीही केली जात नाही.

ठळक मुद्देउखडलेल्या रस्त्यांवरून पायपीट : जाचक अटींमुळे डागडुजी होत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : आयुष्यभर वनसंपदा आणि वन्यप्राण्यांवर जीवापाड प्रेम करूनही पैनगंगा अभयारण्यातही आदिवासी बांधवांच्या नशिबी खरतड रस्तेच आहेत. अभयारण्याच्या जाचक अटींमुळे बंदीभागातील रस्त्यांची डागडुजीही केली जात नाही. वर्षानुवर्षे उखडलेल्या रस्त्यांवरून पायपीट सुरू आहे.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर विस्तीर्ण जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. या परिसरातून वाहणाऱ्या नदीमुळे अभयारण्याला पैनगंगा असे नाव देण्यात आले. शेकडो वर्षांपासून या जंगलांमध्ये आदिवासींचे वास्तव्य आहे. सुमारे ४० ते ५० गावे या अभयारण्याच्या बंदी भागात येतात. आयुष्यभर या भागातील आदिवासींनी वनसंपदा आणि वन्यजीवांवर प्रेम केले. मात्र आता त्यांच्याच जीवावर या अभयारण्याचे जाचक कायदे उठले आहे. अभयारण्याच्या जाचक कायद्यामुळे या भागातील रस्त्यांची डागडुजी केली जात नाही. वन्यप्राणी डांबरी रस्त्यावरून घसरुन जखमी होतील, त्यामुळे या भागातील कोणताही रस्ता डांबरी झाला नाही. वर्षानुवर्षे खडीकरण केलेले रस्ते या भागात आहे. परंतु खडीकरणाचेही डागडुजी करायला कुणाला वेळ नाही. बहुतांश गावांना जोडणाºया रस्त्यांवरील गिट्टी उखडली आहे. रस्त्यावरून चालण्याऐवजी बाजूच्या पाऊल वाटेवरून वाहन न्यावे लागते. उन्हाळ्यात या रस्त्यावरून वाहन जाऊ शकते. परंतु पावसाळ्यात झालेल्या चिखलाने कोणतेही वाहन जात नाही. परिणामी बंदी भागातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. कुणी आजारी पडल्यास त्याला खाटेवर टाकून ढाणकीपर्यंत आणावे लागते.रस्ते म्हणजे विकासाचे महाद्वार परंतु या भागातील रस्त्यांची झालेली अवस्था येथील नागरिकांना विकासापासून कोसोदूर नेत आहे. रस्त्यासाठी या भागातील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली. प्रशासनाला निवेदने दिली. बारमाही रस्ते करण्याची मागणी केली. परंतु जाचक अटींचे कारण पुढे करून या भागातील रस्त्यांची साधी डागडुजीही केली जात नाही. परिणामी हा भाग आजही विकासापासून कोसोदूर आहे.