शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

दहाचे कॉईन परत येणार नाही

By admin | Updated: February 9, 2017 00:25 IST

दहा रूपयाचे कॉईन बंद होणार असल्याच्या अफवेने बाजारात चांगलाच जोर धरला आहे.

छोटे व्यवहार अडचणीत : अफवांमुळे दररोज जमा होत आहेत हजारो कॉर्ईन यवतमाळ : दहा रूपयाचे कॉईन बंद होणार असल्याच्या अफवेने बाजारात चांगलाच जोर धरला आहे. परंतु दहा रूपयाचे कॉईन बंद होणार नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. त्यानंतरही बँकामध्ये दररोज हजारो कॉईन जमा होत आहे. जमा होणारे कॉईन परत येणार नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात चिल्लर नाण्याच्या तुटवडयाचा सामना सर्वसामान्यांना करावा लागण्याचा धोका वाढला आहे. पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर दहा रूपयाचे कॉईन बंद होण्याची अफवा पसरली. या अफवेने सर्वसामान्य चांगलेच अडचणीत सापडले आहेत. छोटे दुकानदार, हमाल, भाजी विक्रेते, फळविक्रेते, कटिंगवाले, हॉटेल व्यवसाई, अ‍ॅटोरिक्षा चालक यासारखे अनेकजण दहा रूपयाचा कॉईन नाकारत आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहक वैतागला आहे. यामुळे दहा रूपयांचे कलदार घेवून बँकेत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यापूर्वी कधीही बँकांमध्ये चिल्लर गोळा करण्यासाठी गर्दी झाली नव्हती. एकवेळा बाजारात आलेले नाणे ४० ते ५० वर्षे झिजत नाही. त्यामुळे ते बाद होत नाही. मात्र बँकेत जमा झालेले नाणे रिझर्व बँक परत पाठवित नाही. ते वितळून नवीन नाण्यासाठी त्याचा वापर होतो. ही प्रक्रीया महागडी आहे. यामुळे नवीन नाणे छापण्याची गती मंद असते. यातून बाजारात मोजकेच चिल्लर नाणे दिसतात. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. मात्र अफवेने १० रूपयांचा व्यवहारच अडचणीत सापडला आहे. ही नाणे बँकेत जमा झाल्यास भविष्यात चिल्लर व्यवहार होणे अवघड होणार आहे. (शहर वार्ताहर) डुप्लिकेट नाणे अशक्य नाणे तयार करण्यासाठी येणारा खर्च किमतीच्या बरोबरीचा आहे. यामुळे १० रूपयांची डुप्लीकेट नाणे बाजारात येणे अशक्य असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. नाणे बंद होणार ही अफवा आहे. त्याला बळी न पडण्याचे आवाहनसुद्धा बँकेने केले आहे. तसेच दहा रुपयांचे नाणे नाकारणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.