शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

अवकाळी पावसाचा रबीला तडाखा, पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

जिल्ह्यात गुरुवारी महागाव, आर्णी, घाटंजी, उमरखेड, दारव्हा, यवतमाळ आदी तालुक्यांना पावसाने तडाखा दिला. उर्वरित तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, रबी ज्वारी, तूर, हरभरा, गहू, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानझाले. वर्षभरातील दुसºया मोठ्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यातून शेतकरी अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : महागाव तालुक्यात गारपीट, उमरखेड, आर्णी, घाटंजीत वादळी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आधीच संकटात सापडलेल्या जिल्ह््यातील शेतकऱ्यांना गारपीट व वादळी पावसाने तडाखा दिला. या पावसामुळे रबीतील गहू, हरभरा, ज्वारीसह खरिपातील तूर पीकही हातचे जाण्याची भीती वर्तविली जात आहे. हजारो हेक्टरवरील रबी पिके बाधित होण्याची शक्यता असल्याने शेतकरी कोलमडले आहे.जिल्ह्यात गुरुवारी महागाव, आर्णी, घाटंजी, उमरखेड, दारव्हा, यवतमाळ आदी तालुक्यांना पावसाने तडाखा दिला. उर्वरित तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, रबी ज्वारी, तूर, हरभरा, गहू, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानझाले. वर्षभरातील दुसऱ्या मोठ्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यातून शेतकरी अडचणीत आले आहेत.अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ८० टक्के पीक क्षेत्र नुकसानीच्या छायेत आले आहे. याचा सर्वात मोठा फटका कापसाला बसला आहे. काढणीला आलेला कापूस ओला झाला. आता त्याला कोंब फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे. सततच्या पावसाने हा कापूस काळवंडण्याचाही धोका आहे. यामुळे धाग्याची प्रत घसरून कापसाचे दर खाली घसरण्याचा धोका आहे. यामुुळे खुल्या बाजारात कापसाचे दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. पणन महासंघ ८ ते १२ टक्के ओलावा असलेला कापूस स्वीकारणार आहे. वातावरणातील आर्द्रतेने या केंद्रावर ओला झालेला कापूस अपात्र ठरणार आहे. असा कापूस खुल्या बाजारातच मातीमोल भावाने विकावा लागणार आहे. सततच्या ढगाळी वातावरणाने तुरीवर अळीचा हल्ला झाल्याने बार करपत आहे. यामुळे तुुरीचे उत्पादनही घटणार आहे. अशीच अवस्था हरभऱ्याची आहे. हरभऱ्यावर घाटेअळीचा हल्ला चढला आहे. हरभऱ्याची फुलगळ होत आहे. हळदीचे क्षेत्र मोठे आहे. बुरशी रोगाचे आक्रमण झाले आहे. हळद करपण्यास सुरूवात झाली आहे.उन्हाळी हंगाम लांबण्याचा धोकाअवेळी आलेल्या पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. तूर काढणीला यामुळे विलंब होणार आहे. कपाशीचे क्षेत्रही उशिरा रिकामे होण्याचा धोका आहे. यामुळे उन्हाळी भुईमूग लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.महागाव तालुक्याला गारपिटीचा फटकामहागाव तालुक्यातील हिवरासंगम, सवना, गुंज, करंजखेड, थार, कवठा, वेणी, डोंगरगाव, वाकोडी, वाडी, मोरथ या गावांमध्ये गारांसह पाऊस झाला. सकाळच्या सुमारास झालेल्या या पावसाने गहू, रबी ज्वारी, कापूस, तूर, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवेळी आलेल्या या पावसाने शेतामधील पिकांचे अतोनात नुकसान झाले. खडका येथे शेकडो क्ंिवटल कापूस भिजला. कापूस खरेदी करण्यासाठी झालेल्या विलंबामुळे कापूस संकलन केंद्रावर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मारेगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात गत दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सरासरी ५.७० मिमी पावसाची नोंद हवामान विभागाने केली. सर्वाधिक १५ मिमी पाऊस मारेगाव तालुक्यात कोसळला आहे. यवतमाळ ९.८७, बाभूळगाव ४.२०, कळंब ५.५४, दारव्हा ६.४६, दिग्रस ७.८८, आर्णी ०.६३, नेर २.७१, पुसद २.४७, उमरखेड १.४६, महागाव ४.३८, वणी ८.१२, झरी ८.५५, केळापूर ५.८३, घाटंजी ०.०७, राळेगाव २.८२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात सापडला आहे. त्यांंना पिकांच्या नुकसानीची चिंता सतावत आहे.प्रथमच हळदीला फटकाजिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वाढत आहे. याच सुमारास निसर्ग प्रकोपाने हळदीला मोठा फटका बसला आहे. बुरशी रोगाच्या आक्रमणाने हळद मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त होण्याची भीती वर्तविली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस