शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

गलेलठ्ठ पगार, तरीही घरभाडे थकीत !

By admin | Updated: December 9, 2014 22:57 IST

अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाममात्र शुल्कात शासकीय वसाहतीतील घर उपलब्ध करून दिले जाते. अधिकाऱ्याचा हुद्दा पाहून घराचा आकार ठरतो. मात्र गलेलगठ्ठ पगार घेऊनही अधिकारी-कर्मचारी सेवा शुल्क भरत नाही.

जिल्हा परिषद : वेतनातून कपातीचे आदेश, अधिकाऱ्यांना प्रधान सचिवांचा चापयवतमाळ : अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाममात्र शुल्कात शासकीय वसाहतीतील घर उपलब्ध करून दिले जाते. अधिकाऱ्याचा हुद्दा पाहून घराचा आकार ठरतो. मात्र गलेलगठ्ठ पगार घेऊनही अधिकारी-कर्मचारी सेवा शुल्क भरत नाही. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना चक्क प्रधान सचिवांकडून वेतन कपातीची नोटीस बजाविण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेतील नऊ अधिकाऱ्यांनी शासकीय निवासस्थानांचे सेवा शुल्क थकविले. त्याच्या वसुलीची जबाबदारी बांधकाम विभागातील लिपिकावार सोपविण्यात आली आहे. मात्र थकीतदार वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांच्याकडे तगादा लावणे शक्य होत नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उप कार्यकारी अभियंता, गट विकास अधिकारी अशा वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना थकलेले शुल्क मागावे कसे, असा प्रश्न निर्माण होतो. सेवा शुल्क थकल्याने शासकीय निवास्थानाचे वीज बिल, पाण्याची देयके थकीत राहतात. बरेचदा पुरवठा तोडण्याची नामुष्की ओढवते. सेवा शुल्काचे तब्बल एक लाख ९१ हजार ८८० रुपये थकीत आहेत. वसुलीसाठी पत्रव्यवहार करूनही कोणताच फायदा झाली नाही. सर्वाधिक थकीत रक्कम जिल्हा परिषदेचे तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रमणी खंदारे यांच्याकडे ५९ हजार २८० रुपये इतकी आहे. त्यांची ठाणे जिल्हा परिषदेत बदली झाली. या सेवा शुल्कासाठी थेट ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह, ठाणे जिल्हा परिषद सीईओकडे पत्रव्यवहार करावा लागला. यावरून अधिकारी वर्ग किती निगरगट्ट आहे, हे दिसून येते. यानंतरही वरिष्ठांनी थेट वेतनातून शासकीय निवासस्थानाच्या सेवा शुल्काची रक्कत कपात करावी, असा आदेश दिला. वेतन कपातीच्या भितीने सेवा शुल्क थकविणाऱ्या अधिकाऱ्यांनी तातडीने रकमा जमा केल्या. पंचायत व्यवस्थेतील महत्त्वाच्या पदावर असलेले अधिकारी आपले उत्तरदायित्व पार पाडत नाही. त्यामुळे याचा परिणाम प्रशासनावरही दिसून येतो. आजही अनेक गावांमध्ये गृह आणि पाणी कराचा भरणाच केला जात नाही. कर वसुलीसाठी नियुक्त अधिकारीच स्वत: शासकीय रकमेचा भरणा करण्यास कुचराई करतात. याचेच पडसाद शासकीय यंत्रणेत विविध स्तरावर पडलेले पहावयास मिळत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)