शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ईगल इन्फ्रास्ट्रक्चरला १२ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:25 IST

रस्त्याच्या कामासाठी अनधिकृत गौण खनिजाचे खनन केल्याप्रकरणी दंड का आकारण्यात येऊ नये, याबाबतची नोटीस १५ जुलैला तहसीलदार अरुण शेलार यांनी ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला बजावली होती.

ठळक मुद्देतहसीलदारांची कारवाई : दारव्हा-कुपटा मार्गासाठी अवैध खनन

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : रस्त्याच्या कामासाठी अनधिकृत गौण खनिजाचे खनन केल्याप्रकरणी दंड का आकारण्यात येऊ नये, याबाबतची नोटीस १५ जुलैला तहसीलदार अरुण शेलार यांनी ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला बजावली होती. सदर कंपनीने अनधिकृत गौण खनिज खनन व वाहतूक याबाबत योग्य खुलासा सादर न केल्याने कंपनीला ११ लाख ७० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.दारव्हा-कुपटा मागार्साठी मांगकिन्ही येथील खाजगी शेतजमिनीतून ३०० ब्रास मुरूम खनन करून चोरट्या मार्गाने सदर गौण खनिजाची विल्हेवाट लावल्याचे आढळून आल्यानंतर सदर कंपनीला दंडाची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसमुळे कंपनीचे धाबे दणाणले होते. ईगल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून दारव्हा-कुपटा मार्गाच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या कामाकरिता कंपनीकडून मांगकिन्ही येथील एका शेतकऱ्याच्या शेतात अवैधरित्या मुरूमाचे खनन करण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदारांच्या सूचनेवरून तलाठ्याने पंचनामा करून अहवाल सादर केला होता. त्यानुसार सदर शेतातून विनापरवाना ३०० ब्रास मुरूमाचे खनन करून चोरट्या मार्गाने त्याची विल्हेवाट लावल्याचे आढळून आले होते.विनापरवाना गौण खनिज खनन करून विल्हेवाट लावणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ व पोट कलम ८ (१) ( २) तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब मधील परिच्छेद ८, ९ आणि ९.२ मधील तरतुदीनुसार दंडास पात्र आहे. त्यामुळे तहसीलदारांनी कंपनीला ११ लाख ७० हजार रुपये दंड का लावण्यात येऊ नये याबाबतची नोटीस १५ जुलैला दिली होती. या नोटीसमध्ये २४ तासात हजर होऊन खुलासा करण्याची निर्देश कंपनीला दिले होते. त्यानुसार सदर कंपनीने २६ जुलै रोजी खुलासा सादर केला. या प्रकरणातील पंचनामा व कंपनीच्या खुलाशाचे अवलोकन केले असता सदर कंपनीने वाहतुकीद्वारे मांगकीन्ही येथील गट नंबर ९८/१ मधील केलेली ३०० ब्रास मुरमाची वाहतूक अवैध असल्याचे स्पष्ट स्पष्ट झाले. त्यामुळे कंपनीला दारव्हा तहसीलदारांनी ३०० ब्रास मुरूमाचा ११ लाख ७० हजार रुपये दंड ठोठावला असून दंडाची रक्कम तत्काळ भरण्याचे आदेश सदर कंपनीला दिले आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार