शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वणीत डेंग्यूसदृश आजार अनियंत्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:31 IST

वणी शहरात गेल्या एक महिन्यांपासून डेंग्यसदृश्य आजाराचे अक्षरश: थैमान सुरू आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात या आजाराने बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देएका वॉर्डात २० रूग्ण : नियमित फवारणी होत नसल्याचा नागरिकांचा आरोप

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहरात गेल्या एक महिन्यांपासून डेंग्यसदृश्य आजाराचे अक्षरश: थैमान सुरू आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात या आजाराने बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे अशाच आजाराने दोघांचा मृत्यू झाल्याने वणी उपविभागात मृतांची संख्या आता तीन झाली आहे.यापूर्वी वणी शहरात १३ आॅक्टोबरला एका शाळकरी मुलीचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला होता, हे विशेष. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची बाब लक्षात आल्यानंतर वणीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांनी वणी नगरपालिकेला पत्र लिहून शहरात फवारणी करण्याच्या सूचना केल्या. त्यावरून नगरपालिकेने शहरात फवारणी सुरू केल्याचा दावा केला असला तरी समाधानकारकरित्या फवारणी होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान घसरल्याने रात्रीच्यावेळी नागरिक बोचऱ्या थंडीचा अनुभव घेत आहे. या वातावरणामुळे डासांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातूनच डेंग्यूसदृश्य आजारात वाढ झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकीकडे शहरात डेंग्यूसदृश्य आजाराचे थैमान असताना नगरपालिकेचा आरोग्य विभाग मात्र अद्यापही निद्रावस्थेत असल्याचा गंभीर आरोप प्रहारचे उपजिल्हा प्रमुख अखिल सातोकर यांनी केला आहे. शहरातील आरोग्य व्यवस्थेवर खर्च करण्यासाठी पालिकेला मोठा निधी येतो. परंतु या निधीचे काय होते, हे कुणालाही कळत नाही. आज वणी शहरातील आरोग्याची स्थिती अतिशय बिकट असताना आरोग्य विभागाने ही स्थिती बेदखल करणे, ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे सातोकर म्हणाले.शहरातील आरोग्याची परिस्थिती लक्षात घेता, ज्या प्रमाणात फॉगींग मशिनने फवारणी करायला हवी, त्या प्रमाणात केलीच जात नसल्याने दिवसेंदिवस डेंग्यूसदृश्य रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शासकीय रूग्णालयांमध्ये या आजारावर उपचारासाठी आवश्यक असलेली व्यवस्था नसल्याने सामान्य गरिब रूग्णांना खासगी रूग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे.शहरातील देशमुखवाडीतील एका अतिशय सामान्य गरिब रूग्णाला या आजाराची बाधा झाली. त्याला उपचारासाठी वणीतील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुटी झाली तेव्हा त्याची हाती तब्बल ३७ हजारांचे बिल देण्यात आले. अनेक रूग्णांना असाच भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासकीय रूग्णालयात उपचाराची सोय करण्याची मागणी आहे.रूग्णांच्या नातलगांकडून गावठी उपचारावर भरडेंग्यूसदृश्य आजाराने शेकडो रूग्ण बाधित आहे. त्यामुळे शहरातील खासगी रूग्णालय रूग्णांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. अनेक रूग्णांचे नातेवाईक या आजारावर उपचार म्हणून गावठी उपचार करीत आहे. पपईच्या पानाचा रस या आजारावर उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य