शरद देशपांडे : गुरूदेव सेवा मंडळातर्फे सत्कारलोकमत न्यूज नेटवर्कपुसद : जीवन क्षणभंगूर असले तरी अत्यंत महत्त्वाचे आहे. संत-महात्म्यांनी जगण्याची प्रेरणा दिली. मनुष्याने आपल्या आवडीप्रमाणे जीवन जगले पाहिजे. त्यातूनच परोपकारी घडतो. केवळ मोहमायेत गुरफटून न जाता भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानावे, असे प्रतिपादन पुसद येथील न्यायाधीश शरद देशपांडे यांनी केले.गुरूदेव सेवा मंडळ तालुका शाखेच्यावतीने न्या.देशपांडे यांच्या स्थानांतरणानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव प्रा.प्रकाश लामणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर बनस्कर, ज्योती देशपांडे, शिवशंकर नागरे, नंदकुमार पंडित, भगवान हातमोडे, ज्ञानेश्वर ताकतोडे, माधव जाधव उपस्थित होते. न्या.देशपांडे यांचा सत्कार मनोहर बनस्कर यांच्या हस्ते तर त्यांच्या पत्नी ज्योती देशपांडे यांचा सत्कार छाया लामणे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला नागेश ढाले, अनिल अस्वार, बाबासाहेब वाघमारे, साहेबराव राठोड, डॉ.संजय गुंबळे, डॉ.अनिल भावसार, नारायण कवटकर, संभाजी बळी, प्रभाकर चव्हाण, ताई देशपांडे, डॉ.सुलभा पिंजरकर, लक्ष्मी राजने, विमल वाघमारे उपस्थित होते.
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ
By admin | Updated: May 16, 2017 01:33 IST