शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

यवतमाळात उत्साहात घटस्थापना; शतकीय दुर्गोत्सवाला देखाव्यांची झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:17 IST

देशातला दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून यवतमाळचा दुर्गोत्सव ओळखला जातो. या उत्सवाला १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. या परंपरेत मानाचा तुरा खोवण्याचे काम दुर्गोत्सव मंडळांच्या देखाव्यांनी केले आहे.

ठळक मुद्देदेशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उत्सवाचा लौकिक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशातला दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून यवतमाळचा दुर्गोत्सव ओळखला जातो. या उत्सवाला १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. या परंपरेत मानाचा तुरा खोवण्याचे काम दुर्गोत्सव मंडळांच्या देखाव्यांनी केले आहे. यंदा पावसाचा व्यत्यय असूनही विविध देखावे साकारण्यात आले आहे.बालाजी चौकस्थित बालाजी मंडळ दुर्गादेवी उत्सव मंडळाचे ५४ वे वर्षे आहे. या मंडळाने वैष्णोदेवी धाम पहाडात साकारला आहे. याकरिता ७० फूट उंच पहाड बाशाच्या मदतीने तयार केला आहे. संपूर्ण पहाडाला प्रदक्षिणा घातल्यानंतर माँ वैष्णोदेवीचे दर्शन भक्तांना घडणार आहे. यामुळे हे अद्भुत दृश्य पाहून माँ वैष्णोदेवीचे दर्शन झाल्याचा भास होणार आहे.वडगावातील सुभाष क्रीडा मंडळाचे ५३ वे वर्षे आहे. या मंडळाने पृथ्वी वाचविण्याचा संदेश देण्यासाठी पहाड साकारला आहे. त्यावर पृथ्वी साकारली आहे. यावरून खळखळणारे झरे, वृक्ष आणि पृथ्वीला आधार देणारे हात साकारण्यात आले. पाणी बचतीसोबत वृक्ष संवर्धनाचा संदेशही दिला आहे. बंगईवर बसलेली देवी, वाघ आणि बछडे साकारले आहे.वडगावातील सिद्धीविनायक नगरातील माँ जगदंबा दुर्गोत्सव मंडळाचे १७ वे वर्षे आहे. या मंडळाने वेरूळची अजिंठा लेणी तसेच हेमाडपंती कैलास मंदिर साकारले आहे. त्यासाठी बंगाली कारागिरांनी मेहनत घेतली.एकता दुर्गोत्सव मंडळाचे ३३ वे वर्षे आहे. या मंडळाने माँ दुर्गा वृद्धांची आधार बनल्याचा देखावा साकारला आहे. वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणाऱ्या मुलांची आणि सुनांची चांगलीच कानउघाडणी करणारा हा देखावा आहे.लोकमाता दुर्गोत्सव मंडळाचे ३४ वे वर्षे आहे. महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजे, असा संदेश देखाव्यातून मांडण्यात आला आहे. जय हिंद दुर्गोत्सव मंडळाचे ५६ वे वर्षे आहे. या मंडळाने मंदिराला आकर्षक कलशाचे रूप दिले आहे. या सोबतच सामाजिक उपक्रमावर प्राधान्याने भर दिला आहे.शिवाजी नगरातील दुर्गोत्सव मंडळाने अमरनाथची गुफा आणि त्यात बर्फाची पिंड साकारली आहे. या मंडळाचे तिसरे वर्ष आहे. छोटी गुजरी चौकातील एकता दुर्गोत्सव मंडळाचे ४८ वे वर्षे आहे. या मंडळाने ५१ फूट उंच जहाज साकारले आहे.दत्त चौकातील बब्बी पहेलवान सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाचे ७८ वे वर्षे आहे. या मंडळाने यावर्षी फायबरचे मंदिर बनविले आहे. या ठिकाणी ३५ वर्षांपासून अखंड दीप तेवत ठेवला आहे. राणी झाँशी बंगाली दुर्गोत्सव मंडळाचे ८ वे वर्षे आहे. या मंडळाने थेट कोलकत्यावरून माँ दुर्गेची मूर्ती यवतमाळात आणली आहे.झाँकीनी लक्ष वेधलेरविवारी घटस्थापनेच्या दिवशी यवतमाळात विविध झाँकी साकारण्यात आल्या. ढोलताशा पथक आणि परंपरागत वारकरी मंडळीने माँ भवानीची स्थापना केली. काही मंडळांनी ऐतिहासिक दृश्यांना उजाळा दिला.

टॅग्स :Navratriनवरात्री