शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे भेसळयुक्त बियाणे देणाऱ्या कंपनीला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अधिक उत्पादन देणाऱ्या तुरीच्या बियाण्यांसोबत इतर बियाणे माथी मारून शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार ठरलेल्या कंपनीला जिल्हा ...

ठळक मुद्दे‘हरितक्रांती’ला दंड : दिग्रसच्या शेतकºयांना ग्राहक न्यायालयाचा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अधिक उत्पादन देणाऱ्या तुरीच्या बियाण्यांसोबत इतर बियाणे माथी मारून शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार ठरलेल्या कंपनीला जिल्हा ग्राहक न्यायालयाने दंड ठोकला आहे. दिग्रस तालुक्याच्या डेहणी येथील सहा शेतकऱ्यांना हरितक्रांती सीड्स कंपनीने (बुलडाणा) नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे.डेहणी येथील मधुकर किसन ढाकुलकर, गोपीचंद परसराम आडे, उत्तम काळू जाधव, मिलन गोकुल राठोड, अनिल झापा राठोड, अब्दुल रज्जाक म. इब्राहीम दोसानी या शेतकऱ्यांनी सदर कंपनीविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनी हरितक्रांती सिड्स कंपनीचे आयसीपीएल-८७ या वाणाचे तूर बियाणे खरेदी करून शेतात लावले. अधिक उत्पादन देणारे हे वाण असल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात या वाणाचे उत्पादन अतिशय कमी झाले. याचा शोध घेतला असता सदर वाणाच्या बियाण्यांमध्ये इतर प्रकारची बियाणे भेसळ केल्याची बाब निदर्शनास आली. केवळ १० ते १२ टक्के उत्पादनच आयसीपीएल-८७ या वाणाचे आले.कंपनीने भेसळयुक्त बियाणे दिल्याने नुकसान भरपाईसाठी या शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. दोनही बाजूच्या युक्तिवादाअंती कंपनीने शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणे पुरविल्याचे सिद्ध झाले. शेतकऱ्यांच्या नुकसानीस कंपनी जबाबदार असल्याने या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आदेश मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य सुहास आळशी यांनी दिला आहे. मानसिक व शारीरिक त्रास आणि तक्रार खर्चाची रक्कमही द्यावी, असे या आदेशात म्हटले आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.विक्रेता व प्रमाणिकरण यंत्रणा मुक्तउत्पादन कमी झालेल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणा अकोला आणि विक्रेत्याविरूद्धही ग्राहक न्यायालयात तक्रार नोंदविली होती. या दोनही संस्थांना सदर प्रकरणातून मुक्त करण्यात आले आहे. बियाण्यातील दोषाकरिता विक्रेत्याला जबाबदार धरता येणार नाही, तर बीज प्रमाणिकरण यंत्रणेचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध दिसून येत नाही, असे मंचाने निकालपत्रात म्हटले आहे.