शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वन खात्याच्या फौजेला वाघिणीची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:48 IST

गेल्या काही महिन्यात अनेकांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघिणीच्या शोधार्थ ३० ते ४० वन कर्मचाºयांची फौज जंगलात राबते आहे, तिचे लोकेशन मिळविण्यासाठी ६० ट्रॅप कॅमेरेही लावले आहेत.

ठळक मुद्दे६० ट्रॅप कॅमेरातही दर्शन नाही : दोन महिने प्रयत्नांची पराकाष्ठा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या काही महिन्यात अनेकांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघिणीच्या शोधार्थ ३० ते ४० वन कर्मचाºयांची फौज जंगलात राबते आहे, तिचे लोकेशन मिळविण्यासाठी ६० ट्रॅप कॅमेरेही लावले आहेत. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ही वाघिणी वन खात्याला हुलकावणी देत असल्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही या ‘रेस्क्यु आॅपरेशन’ला यश येताना दिसत नाही.पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाऱ्या राळेगाव तालुक्याच्या सखी कृष्णापूर गावात वाघाने शेतकºयाची शिकार केली होती. त्यावेळी संतप्त जमावाने उपविभागीय महसूल अधिकाºयाचे वाहन पेटविले होते. त्यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पांढरकवडा वन विभागांतर्गत सात ते आठ बळी गेले असताना वन खात्याकडून या हिंस्त्र वाघाचा गांभीर्याने शोध घेतला जात नाही, अशी त्यावेळी नागरिकांची ओरड होती. त्यानंतर पांढरकवडा उपवनसंरक्षक म्हणून रुजू झालेल्या थेट भारतीय वन सेवेच्या महिला अधिकारी के.अभर्णा यांनी वाघाची शोध मोहीम हाती घेतली. सुरुवातीला ठसे, विष्ठा, लाळ यावरुन शिकार करणारा तो वाघ नव्हे तर पट्टेदार वाघीण असल्याची ओळख शास्त्रोक्तपद्धतीने पटविण्यात आली. त्यानंतर वाघिणीला पकडण्यासाठी खास व्युहरचना करण्यात आली. त्यासाठी यवतमाळ, पुसद, अकोला वन विभागातील सुमारे ३० ते ४० विशेष कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले. त्यात वाघाशी संबंधित प्रशिक्षण घेतलेल्या वनपाल-वनरक्षकांचा समावेश आहे. सोबतीला विविध लोकेशनवर ६० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. चार ते पाच ठिकाणी मचान बांधले गेले, सखी आणि उमरी या गावांमध्ये २५ ते ३० कर्मचाऱ्यांचा बेस कॅम्प लावण्यात आला. वन खात्याची ही फौज दोन महिन्यांपासून पांढरकवडा वन विभागातील जंगलात गस्त घालत आहे. स्वत: आयएफएस के. अभर्णा रात्री केव्हाही जंगलात जाऊन या मोहिमेची पाहणी करीत आहे. स्वत: गस्त घालत आहे. त्यांचे परिश्रम पाहून गावकरीही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. हेच प्रयत्न दोन वर्षाआधी झाले असते तर आतापर्यंत वाघ पकडला जाऊन इतरांचे प्राण वाचले असते, असा गावकऱ्यांचा सूर आहे. ट्रॅप कॅमेरातील चीप दररोज सकाळी काढून संशयित वाघ ट्रेस झाला का हे तपासले जात आहे. परंतु सदर वाघीण सतत लोकेशन बदलवित आहे, ज्या मार्गाने ती एकदा गेली त्या मार्गाने ती पुन्हा येत नसल्याचे निरीक्षक वन अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. जंगलात राबणाऱ्या या वन कर्मचाºयांना भोजन व निवासाची व्यवस्था पंचायत समिती सदस्य व गावकऱ्यांनी केली आहे. आयएफएस के. अर्भणा यांच्या नेतृत्वातील वाघ पकडण्याच्या या मोहिमेवर यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण लक्ष ठेऊन आहेत. ते स्वत:ही जंगलात जात असल्याचे वन खात्यातून सांगण्यात आले. वाघिणीच्या हुलकावणीमुळे सध्या तरी तिला पकडण्याचे आव्हान वन खात्यापुढे आहे.