शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वाघाने युवकाची शिकार केल्याने गावकरी संतप्त, वन विभागाचे समजून एसडीओंचेच पेटविले वाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 23:02 IST

 वाघाच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याने संतप्त जमावाने घटनास्थळी वन विभागाचे समजून चक्क राळेगाव उपविभागीय महसूल अधिका-याचेच वाहन पेटवून दिले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

राळेगाव (यवतमाळ), दि. 16 -  वाघाच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याने संतप्त जमावाने घटनास्थळी वन विभागाचे समजून चक्क राळेगाव उपविभागीय महसूल अधिका-याचेच वाहन पेटवून दिले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार घटनास्थळी दाखल झाले असून प्रचंड पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. सखी येथील सतीश पांडुरंग कोवे (२२) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. सतीश शेतात बैल चारत असताना ही घटना घडली. गेल्या दोन वर्षात राळेगाव तालुक्यात वाघाने सहा जणांचा बळी घेतला. त्यामुळे सखी येथील ग्रामस्थ संतप्त झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जिल्हाधिकारी व इतरांना माहिती देऊन राळेगावचे उपविभागीय महसूल अधिकारी संदीपकुमार अपार सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास सखी येथे पोहोचले. त्यांचे वाहन येताच गोळा झालेल्या संतप्त जमावाने थेट तोडफोड सुरू केली. यावेळी अपार कसे तरी वाहनाच्या बाहेर पडल्याने अनर्थ टळला.यानंतर संतप्त जमावाने वाहनाला आग लावली. तत्पूर्वी तोडफोडीत वाहन चालक शेख हाफीज याच्या डोळ्याला काच लागल्याने ते किरकोळ जखम झाले. त्यानंतर चालकानेही वाहनातून सुरक्षित स्थळी सावरखेडकडे धाव घेतली. दरम्यान वन विभागाचे वाहन समजून संतप्त जमावाने एसडीओंच्या वाहनावर रोष व्यक्त केल्याचे सांगितले जाते. खुद्द एसडीओ अपार यांनीही हीच शक्यता वर्तविली. मृताच्या कुटुंंबियांनी व गावक-यांनी मृतदेह घटनास्थळावरून हलवू देण्यास पोलिसांना मज्जाव केला. परंतु घटनास्थळी पोहोचलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी त्यांच्याशी चर्चा करून समजूत काढली. राळेगाव व त्या भागातील बहुतांश पोलीस ठाण्यांची कुमक सखी- कृष्णापूर गावात पाठविण्यात आली आहे. मुख्यालयातून अतिरिक्त बंदोबस्तही रवाना करण्यात आला. अपर अधीक्षक अमरसिंग जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी तळ ठोकून आहेत. वृत्तलिहिस्तोवर सखी गावातील तणाव कायम होता. 

गावक-यांशी चर्चा केली, मृताच्या कुटुंबियांचीही समजूत काढल्याने तणाव निवळण्यास मदत झाली. परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे. - एम. राज कुमारजिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ