शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाघांची संख्या वाढल्याने वनवर्तुळ तणावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:11 IST

पांढरकवडा वनविभागाच्या जंगलात वाढत असलेली वाघांची संख्या आणि त्यातून पेटलेला वन्यजीव मानव संघर्ष यामुळे वनविभाग सध्या तणावात आहे. जवळपास आठ वाघ-वाघिणी व त्यांचे १८ ते २० बछडे या जंगलात अधिवास करून असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्दे१८ ते २० बछडे : वन्यजीव-मानव संघर्ष पेटला, सहा महिन्यांत बछडे होणार आईपासून दूर

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पांढरकवडा वनविभागाच्या जंगलात वाढत असलेली वाघांची संख्या आणि त्यातून पेटलेला वन्यजीव मानव संघर्ष यामुळे वनविभाग सध्या तणावात आहे. जवळपास आठ वाघ-वाघिणी व त्यांचे १८ ते २० बछडे या जंगलात अधिवास करून असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. त्यातील काही बछडे हे टिपेश्वर अभयारण्यात वास्तव्याला आहेत.‘वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत’ असा दावा भलेही वनविभाग करीत असला तरी वनविभागाअंतर्गत येणाºया जंगलांलगत गावांची संख्या मोठी आहे. टिपेश्वर अभयारण्यापेक्षा बफर झोनमध्येच वाघांचा अधिवास अधिक असल्याची माहिती वनविभागातील सुत्राने दिली. गेल्या काही महिन्यात एका नरभक्षी वाघिणीने १४ जणांचा बळी घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये वन्यजीव व वनविभागाबद्दल प्रचंड रोष आहे. हा रोष कमी करण्यासाठी वनविभागाने राळेगाव परिसरात नरभक्षी वाघिणीला पकडण्यासाठी मोठी फिल्डींग लावली असली तरी अद्याप ती वाघिण वनविभागाच्या जाळ्यात अडकली नाही. तिच्यासोबत तिचे दोन बछडे व वाघ असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे केवळ वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची कसरत सुरू आहे. तिला पकडण्यासाठी मोठा लावाजमा उभा करण्यात आला आहे. असे असले तरी नरभक्षी वाघिण या लावाजम्याला सातत्याने गुंगारा देत आहे.पांढरकवडा वनविभागाअंतर्गत पांढरकवडासह राळेगाव, मारेगाव, झरी, घाटंजी, वणी, आदी तालुके येतात. टिपेश्वर अभयारण्यातील अन्नसाखळी तुटल्याने तृणभक्षी प्राणी या अभयारण्याबाहेर पडल्याचे सांगण्यात येते. वाघाचे खाद्य तृणभक्षी प्राणीच असल्याने या प्राण्यांच्यामागे वाघही जंगलाबाहेर पडलेत. त्यातून वाघ आणि मानव संघर्षाची ठिणगी पडली. सध्या पांढरकवडा वनविभागाअंतर्गत १८ ते २० बछडे असून येत्या काही महिन्यात ते मोठे होऊन आईपासून दूर होणार आहेत. त्यामुळे वनविभागाची चिंता आणखी वाढली आहे. जंगलाला लागून अनेक गावे असून या गावातील नागरिकांचा जंगलाशी संबंध येतो. झरी तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून अनेक लोकांची शेती थेट जंगलातच आहे. वाघाचे दर्शन झाल्यानंतर शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरतात. आता पुन्हा वाघांची संख्या वाढल्याने परिस्थिती धोकादायक बनण्याची भीती जंगलालगतच्या गावामधील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.वाघांची संख्या वाढत असली तरी पांढरकवडा वनविभागाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे वाघांच्या संख्येने कोणती अडचण निर्माण होईल असे वाटत नाही. ज्या दुर्दैवी घटना घडल्या, त्यातील ९० टक्के घटना जंगल भागातच घडल्या आहेत. वन्यजीवांसाठी जंगल क्षेत्र कमी पडते अथवा जास्त आहे, हा तांत्रिक मुद्दा असल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही.- संगीता कोकणे, आरएफओ, पांढरकवडा.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल