शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

हटखोर पावसामुळे जिल्ह्यात अर्धी पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:09 IST

मोसमी पावसावरच शेतीचा हंगाम अवलंबून आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतोच. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते.

ठळक मुद्देदुष्काळी स्थिती : तुरळक ठिकाणी सरी कोसळल्याने पिकांना संजीवनी, सरासरी उत्पन्नाचीही आशा मावळली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोसमी पावसावरच शेतीचा हंगाम अवलंबून आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतोच. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते. आता पीक बहरात आल्यानंतर आकाश निरभ्र असून कडक उन्हात पिके कोळपली आहे. जवळपास ३० टक्के पेरणी पूर्णत: नष्ट झाल्याचा अंदाज कृषी खात्याकडून वर्तविला जात आहे.हमखास पाऊस बरसणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. यावर्षीच्या पावसाने ही ओळख पुसून काढण्याचेच काम सुरू केले आहे. यामुळे संपूर्ण जिल्हाच संकटात सापडला आहे. याची सर्वाधिक झळ शेतकरी कुटुंबाला बसली आहे. कृषी उत्पादनात घट होण्याचा धोका तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.विपूल निसर्ग संपदा लाभलेला जिल्ह्याला वरूणराजाच्या वक्रदृष्टीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाºया जून, जुलै महिन्यातच पावसाने दडी मारली आहे. यामुळे पीक जगवायचे तरी कसे असा प्रश्न प्रत्येकांपुढे उभा ठाकला आहे. या गंभीर स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांनी निसर्गाकडे साकडे घातले आहे.हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतरही पाऊस न बरसल्याने जिल्ह्यातील शेतकरी कुटुंब चिंतेत आहेत. पाऊस बरसावा इतकीच विनंती ते वरूण राजाला करीत आहे. काही मोजक्या गावामध्ये पाऊस बरसला. अनेक ठिकाणी हा पाऊस बरसलाच नाही. यामुळे काही ठिकाणी पिके वाचली तर अनेक ठिकाणी पिके करपली, असे विरोधाभासी चित्र जिल्ह्यात ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.जुलै आणि आॅगस्टचा पाऊस महत्त्वाचासाधारणता जूनमध्ये १५० मिमी, जुलै आणि आॅगस्टमध्ये प्रत्येकी ३५० मिमी पाऊस बरसतो. जून ते जुलैपर्यंत १३९ मिमी इतकाच पाऊस यावर्षी आला आहे. जुलैमध्ये पावसाची मोठी उघडीप राहिली. सर्वाधिक पाऊस पडणाºया महिन्यातच पाऊस गायब आहे. यामुळे भविष्यात पडणाऱ्या पावसामुळे धरणे भरणार किंवा नाही हे सांगणे अवघड झाले आहे. एकूणच विदारक चित्र या ठिकाणी पहायला मिळत आहे.