शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बच्या भीतीने पुसद हादरले

By admin | Updated: January 26, 2017 01:02 IST

गजबजलेला सुभाष चौक. वेळ सकाळी ११.३० ची. अचानक श्वान पथक, बॉम्ब शोधक, नाशक पथक, दंगल नियंत्रण पथक येऊन धडकले.

मॉक ड्रील: श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक व पोलिसांचा गराडा पुसद : गजबजलेला सुभाष चौक. वेळ सकाळी ११.३० ची. अचानक श्वान पथक, बॉम्ब शोधक, नाशक पथक, दंगल नियंत्रण पथक येऊन धडकले. सुभाष चौकात बॉम्ब असल्याची वार्ता शहरभर पसरली. वरिष्ठ पोलीस अधिकारीही तेथे दाखल झाले. मात्र काही वेळातच ही पोलिसांची मॉक ड्रिल असल्याचे पुढे आले आणि पुसदकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुसद शहरातील गजबजलेल्या सुभाष चौकात पोलिसांची मॉक ड्रिल झाली. बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच यवतमाळ येथील बॉम्ब शोधक व नाशक पथक, दंगा नियंत्रण पत्रक, जलद कृती दलासह ५० च्यावर पोलिसांनी या चौकाला वेढा घातला. बॉम्बचा शोध सुरू झाला. नेमके काय झाले, हे कुणालाही कळत नव्हते. त्यामुळे बघ्यांची गर्दी वाढत होती. कुणी तरी बॉम्ब असल्याचे सांगितले. ही वार्ता शहरभर पसरली. अनेकांची यामुळे पाचावर धारण बसली. अखेर बॉम्ब शोधक पथकाने श्वानाच्या मदतीने ‘बॉम्ब’ शोधून काढला. लोहार लाईनमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका प्रवासी बॅगमध्ये बॉम्ब ठेवलेला होता. पोलिसांची मॉक ड्रिल असल्याचे माहीत झाल्यानंतर अनेकजण परतले. परंतु तोपर्यंत तेथे उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहिला होता. शहरात याच वेळात विविध तर्कवितर्क लावले जात होते. कुणी भांडण तर कुणी तणाव झाल्याचे सांगत होते. शहरात मॅसेजही फिरायला लागले होते. परंतु काही वेळातच ही कारवाई म्हणजे सरावाचा भाग असल्याचे सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय बन्सल (आयपीएस), शहर ठाणेदार वाघू खिल्लारे, ग्रामीण ठाणेदार धनंजय जगदाळे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)