शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

ट्रान्सफार्मर जळाल्याने ओलीत दुर्लभ, शेतकरी झाले संतप्त

By admin | Updated: October 9, 2014 23:09 IST

येथील ३३ के़व्ही़ उपकेंद्रातील मजरा-बोदाड शिवारातील कृषी पंपाकरिता असलेले ट्रान्सफार्मर एक आठवड्यापूर्वी जळाला़ अद्याप पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत आहे़

मार्डी : येथील ३३ के़व्ही़ उपकेंद्रातील मजरा-बोदाड शिवारातील कृषी पंपाकरिता असलेले ट्रान्सफार्मर एक आठवड्यापूर्वी जळाला़ अद्याप पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत आहे़विठ्ठल बदकी यांच्या शेतात असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मरवरून परिसरातील २७ कृषी ग्राहकांना विद्युत पुरवठा केला जातो. याशिवाय काही अवैध जोडण्या असण्याचा आरोप आहे़ या ट्रान्सफार्मरच्या क्षमतेनुसार २० कृषी पंपाना विद्युत पुरवठा होऊ शकतो़ परंतु विद्युत विभागाचा आनागोंदी कारभार आणि कामचलावू धोरणामुळे यांत्रिक क्षमता विचारात न घेता नियमबाह्य पध्दतीने जादा जोडण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याचा परिणाम ट्रान्सफार्मरवर झाला. ते ओव्हरलोड होऊन सयंत्रात बिघाड निर्माण झाला. अखेर हे ट्रान्सफार्मरच जळाले.या बाबी परिसरात वारंवार घडत असतात़ या तांत्रिक दोषाकडे विद्युत विभागाचे कर्मचारी, अभियंते दुर्लक्ष करतात़ यात शेतकरी, ग्राहकांसोभतच महावितरणचेही आर्थिक नुकसान होते़ त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतमालांना पाणी देणे कठीण जाते. ओलिताच्या पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन शेतमाल करपून वाळण्याच्या अवस्थेत जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जातो़ सध्या पिकांना ओलिताच्या पाण्याची अत्यंत गरज आहे़ परंतु पाणी असूनही वीजेअभावी शेतकरी हतबल ठरले आहेत़या संदर्भात संबंधित शेतकरी मारेगाव, पांढरकवडा येथील महावितरण कार्यालयात गेले. तेथे त्यांनी पर्यायी ट्रान्सफार्मर त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. यासाठी त्यांनी अनेकदा चकरा मारल्या. तरीही महावितरणचे अधिकारी दखल घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे़ वरिष्ठ कार्यालयाकडून ट्रान्सफार्मर उपलब्ध झाल्यानंतर पाठवू म्हणून शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे. महावितरणच्या चुकीच्या कार्यपध्दतीचा फटका मात्र शेतकरी, ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे़ या नुकसानीला महावितरण जबाबदार नाही का, असा प्रश्न अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)