शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

दुय्यम निबंधकाच्या अनुपस्थितीने तारांबळ

By admin | Updated: January 24, 2015 02:02 IST

येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या आठ दिवसांपासून कायमस्वरूपी दुय्यम निबंधक उपस्थित राहात नसल्याने पक्षकारांची तारांबळ उडत आहे़ पक्षकारांना ताटकळत राहावे लागत आहे.

वणी : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या आठ दिवसांपासून कायमस्वरूपी दुय्यम निबंधक उपस्थित राहात नसल्याने पक्षकारांची तारांबळ उडत आहे़ पक्षकारांना ताटकळत राहावे लागत आहे. येथील दुय्यम निबंधकांकडे दोन तालुक्यांचा कारभार असल्याचे कार्यालयात उपस्थित आॅपरेटने सांगितले़ वणी उपविभागामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात़ त्यामुळे नेहमीच या कार्यालयात दिवसभर गर्दी दिसून येते़ तथापि गेल्या आठ दिवसांपासून दुय्यम निबंधक तीन वाजता, पाच वाजता कार्यालयात हजेरी लावत असल्याने केवळ एक-दोनच व्यवहार होत असतात़ त्यामुळे उर्वरित पक्षकार दिवसभर दुय्यम निबंधकाच्या प्रतीक्षेत असतात.कार्यालयात निबंधक आल्यानंतर कधीकधी नेटवर्कची समस्या निर्माण होते़ त्यामुळे एकही दस्तऐवज नोंदणीकृत होत नाही़ त्यामुळे पक्षकारांना परत जावे लागत आहे़ ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी व इतरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ दस्तऐवज नोंदणीकरिता या कार्यालयात दाखल होतात. खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना घेणार-देणार व सोबत दोन साक्षदार आणावे लागतात़ परंतु निबंधक दुपारी येत असल्याने एक-दोन व्यवहारच नोंदणीकृत होऊ शकतात. त्यामुळे इतरांना आपला क्रमांक केव्हा येईल, याची प्रतीक्षा लागलेली असते. यासोबतच दररोज साक्षदार आणणे म्हणजे पक्षकाराच्या खिशाला चुना लागणे आहे़ या कार्यालयामार्फत लाखोंचा महसूल मिळत असूनसुद्धा येथे कायमस्वरूपी निबंधक का नाही, असा प्रश्न पक्षकार उपस्थित करीत आहे़ संबंधित निबंधक यवतमाळवरून ये-जा करतात. अनेकदा त्यांना येण्यास उशीर होतो. तोपर्यंत पक्षकारांना ताटकळत राहावे लागते. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत. मात्र ते पायदळी तुडविले जात आहे. येथील दुय्यम निबंधकांनी मुख्यालयी उपस्थित राहावे, अशी पक्षकारांची मागणी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)