शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी ट्रॅव्हल्सच्या मद्यधुंद चालकामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2023 20:37 IST

Yawatmal News पुणे येथून बुधवारी रात्री प्रवासी घेवून निघालेल्या ट्रॅव्हल्सचा चालक मद्यधुंद अवस्थेत सुसाट वाहन हाकत होता. हे पाहून त्यातील २५ प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. एका प्रवाशाने दारव्हा ठाणेदाराचा मोबाईल नंबर मिळवून त्यांना संपर्क केला.

यवतमाळ : ट्रॅव्हल्स मालक व चालकांच्या बेदरकारपणामुळे निष्पाप प्रवाशांचा बळी जात आहे. समृद्धी महामार्गावर २५ जणांचा ट्रॅव्हल्स अपघातात नुकताच जळून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच ट्रॅव्हल्स चालक व मालक सुधारण्यास तयार नाही. पुणे येथून बुधवारी रात्री प्रवासी घेवून निघालेल्या ट्रॅव्हल्सचा चालक मद्यधुंद अवस्थेत सुसाट वाहन हाकत होता. हे पाहून त्यातील २५ प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. एका प्रवाशाने दारव्हा ठाणेदाराचा मोबाईल नंबर मिळवून त्यांना संपर्क केला. आपबिती सांगितली. त्यानंतर ही ट्रॅव्हल्स दारव्हा येथे गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता थांबविण्यात आली. तेव्हा प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

 बुधवारी रात्री पुणे येथून २५ प्रवासी घेवून ही ट्रॅव्हल्स नागपूरकडे निघाली. काही अंतर पार केल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक बेदरकारपणे वाहन हाकत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. नुकतीच समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा येथील अपघाताची घटना घडली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाच्या मनात ट्रॅव्हल्सबाबत भीती निर्माण झाली आहे. त्यात चालक काही ऐक ऐकण्यास तयार नव्हता. या संकटातून सुटका कशी करायची अशी धडपड प्रवाशांची सुरू होती. या प्रवाशांनी दारव्हा ठाणेदार विलास कुलकर्णी यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना संपर्क केला.

ट्रॅव्हल्स चालकाच्या कृत्याची व जीव धोक्यात असल्याची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ शहरात बसस्थानकासमोर ही ट्रॅव्हल्स पोलिसांनी थांबविली. चालक अमृत प्रल्हाद थेर (४६) रा. माहुली ता. दारव्हा याला ताब्यात घेतले. तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्ताचे नमुनेही तपासणीला पाठविण्यात आले. ट्रॅव्हल्स मालक व चालक या दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दारव्हा पोलिस ठाण्यात सुरू होती. शिवाय या ट्रॅव्हल्सची सुद्धा आरटीओंकडून तपासणी केली जाणार आहे. ट्रॅव्हल्स मालकावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. त्यानंतर प्रवासी पर्यायी वाहनाने नागपूरकडे रवाना झाले आहे.

प्रवाशांच्या सतर्कतेने टळला अनर्थदिवसाचा प्रवास असल्याने मद्यधुंद चालकाचा प्रताप प्रवाशांच्या लक्षात आला. रात्री जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये मात्र प्रवाशी बिनधास्तपणे झोपी जातात. ट्रॅव्हल्स मालक कुठलीही पडताळणी न करता चालकांना ट्रॅव्हल्स सोपवितात. त्यात प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जातो. असे प्रकार सातत्याने घडत आहे. यवतमाळातील अपघातात १२ प्रवासी तर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतरही यात सुधारणा झालेली नाही. प्रशासन कुठलीच कारवाई करताना दिसत नाही. हप्तेखोरीतून ट्रॅव्हल्स मालकांनी यंत्रणेला दावणीला बांधल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी