शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत बसचालकाचा धिंगाणा

By admin | Updated: September 3, 2016 00:30 IST

अमरावतीवरुन हैद्राबादला जाणाऱ्या पांढरकवडा आगाराच्या एस.टी.बसवर ड्युटी लावण्यात आलेल्या बस चालकाने चक्क दारुच्या नशेत

प्रवासी वेठीस : पांढरकवडा एसटी आगारातील घटनापांढरकवडा : अमरावतीवरुन हैद्राबादला जाणाऱ्या पांढरकवडा आगाराच्या एस.टी.बसवर ड्युटी लावण्यात आलेल्या बस चालकाने चक्क दारुच्या नशेत येथील एस.टी.बसस्थानकावर धुमाकूळ घातल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान आगार व्यवस्थापकाने या बसवर दुसऱ्या चालकाची पर्यायी व्यवस्था करुन ही बस हैद्राबादसाठी रवाना केली. या प्रकारामुळे ताटकळत बसलेल्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.पांढरकवडा आगाराची अमरावती-हैद्राबाद ही बस नेहमीप्रमाणे अमरावतीवरुन बुधवारी रात्री ९.३० वाजता पांढरकवडा बस स्थानकावर आली. पांढरकवड्यावरुन या गाडीचा चालक बदलत असून हैद्राबादपर्यंत दुसऱ्या चालकाची ड्युटी लावण्यात येते. त्यानुसार पांढरकवड्यावरुन हैद्राबादला जाण्यासाठी दुसऱ्या चालकाची ड्युटी लावण्यात आली. एम.एच.४०- वाय ६२०१ या क्रमांकाची पांढरकवडा आगाराची ही बस रात्री ९.३० च्या दरम्यान पांढरकवड्याला आली. अमरावतीवरुन बस घेऊन येणाऱ्या या बस चालकाची पांढरकवडा येथे आल्यानंतर ड्युटी संपल्यामुळे येथून हैद्राबादला जाण्यासाठी दुसऱ्या चालकाला ही बस घेऊन हैद्राबादला जायचे होते. त्यानुसार ज्या चालकाची ड्युटी लावण्यात आली तो दुसरा चालक रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बस स्थानकावर आला. मात्र तो यथेच्छ दारु ढोसलेल्या अवस्थेत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्याची अवस्था एवढी बिकट होती की, तो बसच्या कॅबीनमध्येही व्यवस्थित चढू शकत नसल्याची माहिती प्रवाशांनी दिली. या बसमध्ये २५ ते ३० प्रवासी बसलेले होते. प्रवाशांना आपला बस चालक दारुच्या नशेत तर्र असल्याचे दृश्य दिसताच त्यांनी आरडा-ओरड केली. या दारुड्या चालकाच्या हातात बस देऊ नका म्हणून तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यास सांगितले. परंतु तो कोणाचेच ऐकत नव्हता. उलट प्रवाशांनाच शिवीगाळ करीत होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दारुच्या नशेत तर्र असलेला व प्रवाशांच्या जीवाशी खेळायला निघालेला हा बसचालक आता कुणाचेच ऐकत नाही, हे पाहुन गाडीतील काही प्रवाशांनी आगार प्रमुख व यवतमाळ येथील विभाग नियंत्रकाला भ्रमणध्वनीव्दारे माहिती दिली. विभागीय नियंत्रकांनी आगार प्रमुखांना सुचना देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, आगार प्रमुख एस.बी.डफडे व काही कर्मचारी बसस्थानकावर पोहोचले. परंतु काही वेळातच दारुच्या नशेत तर्र असलेला तो चालक तेथून पसार झाला. या बसमध्ये आदिलाबाद, हैद्राबादला जाणारे अनेक प्रवासी होते. अखेर प्रचंड मनस्ताप झालेल्या काही प्रवाशांनी खासगी गाड्यांनी येथून पुढचा प्रवास केला. उर्वरित प्रवाशांसाठी आगार प्रमुखांनी आठवडी विश्रांतीवर असलेल्या बी.टी.चव्हाण या चालकाला आठवडी विश्रांती रद्द करुन हैद्राबाद गाडीवर पाठविले व पर्यायी व्यवस्था केली. यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या गोंधळात प्रवाशांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले. (तालुका प्रतिनिधी)चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल -आगार प्रमुखकर्तव्यावर जात असतांना मद्यप्राशन करुन येणे हे प्रवाशांच्या जीवाशी खेळणे असून मद्यप्राशन करुन आलेल्या निरंजन खडकीकर याबसचालकावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पांढरकवडा आगाराचे आगार प्रमुख एस.बी.डफडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आपल्याला हा प्रकार कळताच आपण क्षणाचाही विलंब न करता तातडीने बसस्थानकावर पोहोचलो. लगेच दुसऱ्या चालकाला हैद्राबाद गाडीवर पाठवून पर्यायी व्यवस्था केली, असे ते म्हणाले. मद्यप्राशन करुन आलेला बसचालक तेथून पसार झाल्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसल्याची माहितीही त्यांनी दिली.