शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी शिक्षकाच्या शाळेतच डुलक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:18 IST

वणी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या साखरा पोड येथील जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकी शाळेतील एका मद्यपी शिक्षकाच्या प्रतापाने सारे गाव हैराण झाले आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी केले ‘स्टिंग आॅपरेशन’ : जि.प.च्या साखरा पोड शाळेतील प्रकार

आॅनलाईन लोकमतवणी : वणी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या साखरा पोड येथील जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकी शाळेतील एका मद्यपी शिक्षकाच्या प्रतापाने सारे गाव हैराण झाले आहे. वैतागलेल्या गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीने सदर शिक्षकाचे प्रताप मोबाईलमध्ये कैद केले. तशी तक्रारही गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मात्र आठवडा उलटूनही सदर शिक्षकाविरुद्ध कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने शिक्षण विभाग सदर शिक्षकाला पाठिशी तर घालत नाही ना, अशी शंका गावकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.मधुकर देवाळकर असे सदर शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक नेहमीच शाळेत दारू पिवून येत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. तो दारूच्या नशेत राहत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. आतापर्यंत त्याने इंग्रजी विषयाचा एकही पाठ विद्यार्थ्यांना शिकविला नसल्याचे शाळा शिक्षण समितीचे म्हणणे आहे. ३० नोव्हेंबरला मधुकर देवाळकर हा नेहमीप्रमाणे शाळेत मद्य प्राशन करून आला. तो व्हरांड्यातच खुर्ची टाकून त्यावर निद्रीस्त झाला. ही बाब कळताच, गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांनी शाळेत येऊन हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला. त्यानंतर गावातील श्रीराम पाटील आत्राम यांनी देवाळकरला आवाज देऊन उठविले. यापूर्वीदेखील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण आत्राम यांनी देवाळकरला शाळेतच मद्यधुंद अवस्थेत झोपून असताना रंगेहात पकडले होते.यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने ३० नोव्हेंबरलाच पुराव्यासह वणी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केली होती. मात्र आठवडा उलटूनही सदर शिक्षकाविरुद्ध कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मुख्याध्यापकांच्या गैरहजेरीत देवाळकर ‘सैराट’साखरा पोड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आर.एम.धुर्वे यांना अनेकदा मिटींग अथवा शालेय कामासाठी बाहेर जावे लागते. अशावेळी दोन शिक्षकी शाळा असल्याने शाळेवर देवाळकरचेच अधिराज्य असते. मुख्याध्यापकांच्या गैरहजेरीत तो वेळेच्या आधीच शाळेला सुटी देतो व शाळा बंद करून निघून जातो, असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने तक्रारीतून केला आहे. १५ नोव्हेंबरला दुपारी एक वाजताच देवाळकर शाळेला टाळे ठोकून निघून गेला. २९ नोव्हेंबरला मुख्याध्यापक धुर्वे हे शालेय कामकाजासाठी रासा येथे बँकेत गेले असता, दुपारी २ वाजतानंतर शाळा बंदच होती. दुपारनंतर मुख्याध्यापक धुर्वे शाळेत परत आले तेव्हा शाळा बंद आढळली. मुख्याध्यापकांनी घडलेला प्रकार केंद्रप्रमुख नवनाथ देवतळे यांना सांगितला.मागील वर्षभरापासून मधुकर देवाळकर यांच्या वर्तनाने विद्यार्थी वेठिस धरले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांचे शैैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या. यासंदर्भात शिक्षक देवाळकर यांना मुख्याध्यापक म्हणून समज देण्याचा प्रयत्न केल्यास ते अश्लिल भाषेत शिविगाळ करतात. वरिष्ठांनी याविषयी कारवाई करावी.-आर.एम.धुर्वे,मुख्याध्यापक, साखरा पोड