दारव्हा : येथील उपजिल्हा रुग्णालयात मद्यप्राशन करून ड्युटी करीत असलेल्या एका डॉक्टरने जिवंत रुग्णाला मृत घोषित केले. एवढ्यावरच न थांबता डेथ मेमाे बनवून शवविच्छेदन करण्याची तयारी केली. रुग्णाला शवविच्छेदन गृहाकडे नेत असताना त्याने हालचाल केली. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्णाला पुन्हा तपासयला लावले असता, ताे जिवंत असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर रुग्णाला उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. हा प्रकार शुक्रवारी २५ जुलै रोजी रात्री उशीरा घडला.गोरेगाव येथील विषबाधा झालेल्या एका रुग्णाला दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, त्यावेळी सेवेत असलेल्या डॉक्टरने कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन तपासणी न करता रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. डेथ मेमाे तयार करून शवविच्छेदन करण्याची तयारी केली. रुग्णाला शवविच्छेदन गृहाकडे नेण्याच्या हालचाली सुरू केल्या. दरम्यान रुग्णाने हलचाल केली, तसेच डाॅक्टर नशेत असल्याचा संशय नातेवाईकांना आला. त्यांनी डाॅक्टरला पुन्हा तपासणी करण्यास सांगितले. तेव्हा रुग्ण जीवंत असल्याचे आढळले. त्यानंतर घाबरलेल्या डाॅक्टरने डेथमेमाे फाडून तातडीने रेफर पेपर तयार केले. नातेवाईकांनी संताप व्यक्त करत प्रसंगावधान राखून रुग्णालया यवतमाळ येथील शासीकय रुग्णालयात दाखल केले. तेथे रुग्णाची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले.
हा प्रकार काहींनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेश मनवर यांना सांगितला. त्यानंतर अधीक्षक रुग्णालयात हजर पाेहाेचले, त्यांनी संबंधित डॉक्टरला याबाबत मेमो दिला आहे. या प्रकरणात मद्यपी डाॅक्टरवर पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतरही रुग्णांशी गैरवर्तनउपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उपचारासाठी आलेल्या टाकळी येथील एका रुग्ण दाम्पत्यांशी गैरवर्तन केले. शहरातील पंचशील नगर परिसरातील एका गंभीर रूग्णाचे केवळ डोळे तपासून उपचार करण्यास विलंब लावला. त्यावेळी रूग्णांसोबत आलेल्या काही युवकांनी त्या नशेतील डॉक्टरची ऑडीओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग सुध्दा केली आहे.
"घडलेल्या प्रकाराबाबत डॉ.राठोड यांना मेमो देण्यात आला आहे. मद्य प्राशन करून ड्युटी करीत असल्याचे निदर्शनास आले, तसेच पेशंट मृत दाखविला आणि रेफरही केला.याबाबत विचारणा करण्यात आली आहे.
- डॉ.राजेश मनवर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय,दारव्हा.