शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठीवर औषध विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 22:21 IST

येथील काही औषध विक्रीच्या दुकानातून बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरही रूग्णांना औषध देण्यात येत आहे. केवळ एमबीबीएस किवा बीएएमएस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच हे औषध द्यावे, असा नियम असतानाही त्याची येथे सर्रास पायमल्ली केली जात आहे.

ठळक मुद्देवणीतील प्रकार : मेडिकलमध्ये अप्रशिक्षितांकडून दिले जाते औषध

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील काही औषध विक्रीच्या दुकानातून बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरही रूग्णांना औषध देण्यात येत आहे. केवळ एमबीबीएस किवा बीएएमएस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच हे औषध द्यावे, असा नियम असतानाही त्याची येथे सर्रास पायमल्ली केली जात आहे. त्याचबरोबर अनेक मेडिकल स्टोर्समध्ये अप्रशिक्षितांकडून औषधांची विक्री केली जात आहे.वणी शहरात जवळपास १५० च्यावर औषधी विक्रीची दुकाने आहेत. मात्र यातील काही दुकानांतून एमबीबीएस किंवा बीएएमएस डॉक्टरांच्या चिठ्ठीव्यतिरीक्त अनेक बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठ्यावर कोणतीही चौकशी न करता मेडीकलचालक बिनधास्तपणे औषधांची विक्री करीत आहे. त्यामुळे या बोगस डॉक्टर व मेडिकलचालकांमध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याचीही चर्चा आहे.त्याचबरोबर या मेडीकलमध्ये औषधी निर्माण शास्त्राची पदविका किंवा पदवी घेतलेल्यांनाच बसणे बंधनकारक आहे. मात्र अनेक मेडिकलचालकांकडे अद्यापही ही पदवी नसून त्यांनी काही विद्यार्थ्यांकडून सात ते आठ हजार रूपये दरमहाप्रमाणे त्यांच्या पदव्या आपल्या ताब्यात घेतल्याचे बोलले जाते. अधिकृत पदविधारक मात्र या औषधी दुकानात क्वचितच आढळून येतो.अन्यवेळी दुकानाचा मूळ मालकच औषधांची विक्री करीत असल्याचे दिसून येते. या औषधी दुकानांमध्ये काम करणारे अनेक कामगार हे अप्रशिक्षीत आहे. या अप्रशिक्षीतांकडून औषधांची सर्रास विक्री केली जात आहे. मूळ मालक केवळ पैशाच्या काउंटरवर बसून बिले घेण्यातच व्यस्त असतो. अनेकदा एखादी औषधी आपल्या दुकानात उपलब्ध नसल्यास त्याला मिळतेजुळते घटक असणारी औषधी रूग्णांच्या माथी मारली जाते. या सर्व प्रकाराकडे मात्र अन्न व औषधी प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. या विभागाचे अधिकारी व कर्मचारी वणीत फिरकत नसल्यामुळे येथील संबंधित मेडीकलचालकांचे चांगलेच फावत आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी आहे.गर्भपाताच्या गोळ्यांची सर्रासपणे विक्रीयेथील काही मेडिकलमधून गर्भपाताच्या गोळ्यांचीही सर्रासपणे विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. मुळात या गोळ्यांवर शासनाने बंदी घातली असली तरी छुप्या मार्गाने त्याचा वणीत पुरवठा केला जात आहे. या गोळीची किंमत ५०० रूपयांच्या आत असली तरी या गोळ्या मेडिकलचालक तब्बल पाच ते सहा हजार रूपयांपर्यंत विकत असल्याची माहिती आहे. अशा गोळ्या केवळ तज्ज्ञ डॉक्टरच गरज वाटल्यास देऊ शकतो. मात्र मेडिकलचालक स्वत:च या गोळ्यांची विक्री करीत आहेत.

टॅग्स :medicineऔषधंdocterडॉक्टर