शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

चालकाचे हातपाय बांधून मध्यरात्री चक्क औषधाचा कंटेनरच लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST

हैद्राबाद येथून रेड्डीज कंपनीचा औषधसाठा घेऊन एच.आर.४७-डी.९२१९ क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडे निघाला. बुधवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास हा कंटेनर पांढरकवडालगतच्या मराठवाकडी या गावाजवळ पोहोचला. यावेळी अचानक एका ट्रकने या कंटेनरला ओव्हरटेक केले. त्यानंतर तो ट्रक कंटेनरसमोर थांबला. याचवेळी मागून पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन आले. त्यातून तीन ते चार लुटारू खाली उतरले. त्यांनी  चालकांना बांधून कंटेनर पळवून नेला.

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : हैदराबाद येथून औषधांचे बॉक्स घेऊन नागपूरकडे निघालेला कंटेनर राष्ट्रीय महामार्गावरील मराठवाकडी गावालगत लुटण्यात आल्याची थरारक घटना पांढरकवडालगत असलेल्या मराठवाकडी येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली. लुटारूंनी यावेळी कंटेनरमध्ये असलेल्या दोनही चालकांचे हातपाय बांधून शेतात फेकले. त्यानंतर कंटेनर काही अंतरावर नेऊन त्यातील औषधांचा साठा दुसऱ्या ट्रकमध्ये भरून हे लुटारू फरार झाले. सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. कंटेनरमधून नेमका किती औषधसाठा लंपास झाला, याचे मोजमाप सायंकाळपर्यंत सुरू होते. दरम्यान, औषध कंपनीचे अधिकारी पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबाद येथून रेड्डीज कंपनीचा औषधसाठा घेऊन एच.आर.४७-डी.९२१९ क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडे निघाला. बुधवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास हा कंटेनर पांढरकवडालगतच्या मराठवाकडी या गावाजवळ पोहोचला. यावेळी अचानक एका ट्रकने या कंटेनरला ओव्हरटेक केले. त्यानंतर तो ट्रक कंटेनरसमोर थांबला. याचवेळी मागून पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन आले. त्यातून तीन ते चार लुटारू खाली उतरले. त्यांनी  चालकांना बांधून कंटेनर पळवून नेला.  काही वेळानंतर चालकांनी कशीबशी स्वत:ची सुटका करत या घटनेबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांनाही या घटनेबाबत अवगत केले. लुटण्यात आलेला कंटेनर पोलीस ठाण्यात लावण्यात आला असून त्यातील नेमका किती औषधासाठा लुटारूंनी लंपास केला, याची मोजदाज सायंकाळपर्यंत सुरू होती. घटनेची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्यासह एलसीबी व सायबर सेलचे पथक दाखल झाले. लुटारू नेमक्या कोणत्या मार्गाने पसार झाले, याची माहिती घेणे सुरू आहे.  तपास एपीआय विजय महल्ले, पोलीस शिपाई वसंत चव्हाण, शंकर बोरकर करीत आहेत. 

अशी केली सिनेस्टाईल लूट; अर्धा किमी अंतरावर दुसऱ्या ट्रकमध्ये भरली औषधे

- लुटारूंनी कंटेनरच्या केबिनचा ताबा घेत, कंटेनरमध्ये बसून असलेल्या लखन जसराम जाटाव (२४) रा.कालोडी (मध्यप्रदेश) व बलीचंद सेन रा. मध्य प्रदेश या दोघांच्याही डोळ्यावर जबरदस्तीने पट्ट्या बांधल्या. त्यानंतर या दोघांनाही कंटेनरच्या खाली उतरवरून लगतच्या शेतात नेले. तेथे त्यांचे हातपाय बांधले. - लुटारूंपैकी दोघे या चालकांजवळ जवळपास अर्धा तास थांबून होते. यादरम्यान उर्वरित लुटारूंनी औषधाने भरलेला कंटेनर तेथून पाच किलोमीटर अंतरावर पुढे असलेल्या कोंघारा या गावालगत नेला. तेथे कंटेनर थांबवून त्यातील औषधांचा साठा दुसऱ्या ट्रकमध्ये भरून लुटारू पळाले.

महामार्गावरील महिन्यातील लुटमारीची दुसरी घटना- गेल्या महिनाभरातील या मार्गावर घडलेली ही लुटमारीची दुसरी घटना आहे. तीन आठवड्यांपूर्वी रात्रीच्या वेळी करंजी मार्गावरील साखरा गावालगत एका ट्रकचालकाला अशाच पद्धतीने हातपाय बांधून शेतात सोडण्यात आले. त्यानंतर लुटारूंनी त्या ट्रकची सहा चाके पळवून नेली. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे राष्ट्रीय महामार्गावर लुटारूंची दहशत निर्माण झाली आहे.

धावत्या कंटेनरवर दरोडा टाकल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लुटारूंचा शोध घेतला जात आहे. नेमका किती मुद्देमाल लुटारूंनी नेला, याची तपासणी सुरू आहे. - जगदीश मंडलवारठाणेदार, पांढरकवडा पोलीस ठाणे

 

टॅग्स :medicineऔषधंRobberyचोरी