शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

वृक्ष जगविण्यासाठी वापरले पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

मालखेड वनपरिक्षेत्रात वनीकरण २०१९ मध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे. या वृक्षाला पाणी देण्यासाठी वनरक्षक अनंत कोरडे व ठेकेदार अरुण गेडाम यांनी संगनमत करून सोनवाढोणाला जाणारी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फोडली. एअरवॉल तोडून त्यावरून पाणी घेणे सुरू केले.

ठळक मुद्देसोनवाढोणात टंचाई : वन विभागाने फोडली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील सोनवाढोणा येथे दहा किलोमीटर अंतरावरच्या येलगुंडा येथून पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात पाणीच येत नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली. ग्रामपंचायतीने जुनी पाईपलाईन कुचकामी झाल्याने नवी टाकण्यासाठी ७० लाखांच्या निविदा बोलाविल्या. प्रत्यक्ष पाणीटंचाईच्या कारणाचा शोध घेतला असता वनविभागाकडून पाईपलाईन फोडून पाण्याचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघड झाला.मालखेड वनपरिक्षेत्रात वनीकरण २०१९ मध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे. या वृक्षाला पाणी देण्यासाठी वनरक्षक अनंत कोरडे व ठेकेदार अरुण गेडाम यांनी संगनमत करून सोनवाढोणाला जाणारी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फोडली. एअरवॉल तोडून त्यावरून पाणी घेणे सुरू केले. या गंभीर प्रकारामुळे सोनवाढोणा येथे गेल्या काही महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. ग्रामपंचायतीनेही काही तपासणी न करता नवीन पाईपलाईनसाठी प्रस्ताव तयार केला. ७१ लाख रुपयांच्या नवीन पाईपलाईनची निविदा काढण्यात आली. वनविभागाच्या या प्रकारामुळे ग्रामस्थांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. वनविभागात काही अधिकारीच दुसऱ्यांच्या नावाने ठेकेदारी करतात. हाच प्रकार मालखेड वनपरिक्षेत्रात जोरात सुरू आहे. त्यातूनच निर्ढावलेल्या अधिकारी, कंत्राटदाराने चक्क गावाला पाणीपुरवठा होणारी पाईपलाईन फोडून पाण्याचा वापर सुरू केला. आता संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिवाय वृक्षांना पाणी देण्याच्या नावावर वनविभागाकडून काढलेली देयकाची रक्कमही संबंधितांकडून वसूल व्हावी, अशी मागणी होत आहे. पाणी वापराचा गैरप्रकार उघड होण्यास करण्यास झालेल्या विलंबाबद्दलही नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.वनविभागाच्या कारवाईकडे लक्षसर्वसामान्य व्यक्तीने पाण्यासाठी एखादा वॉल तोडला तर त्याला गंभीर स्वरूपाच्या कारवाईला सामोरे जावे लागते. येथे तर वनविभागातील वनरक्षक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीनेच कायदा हातात घेतला आहे. त्यातही वनविभाग व जिल्हा परिषद प्रशासन या दोघांचेही मोठे नुकसान केले आहे. वनविभागाची फसवणूक करत वृक्ष लागवड केलेल्या भागाला पाणी दिले आहे. वनरक्षक व कंत्राटदारावर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करून त्याची नुकसान भरपाई वसूल केली जावी, अशी मागणी होत आहे.वॉल लिकेज असल्याने पाणी घेतले आहे. मात्र पाईपलाईन फोडून पाणी घेतले असल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल.- विनोद कोव्हळे,वनपरिक्षेत्र अधिकारी, नेरसदर गैरप्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पाहणी करण्यात आली. याविषयी गटविकास अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार केली जाईल. पाणी वापराचा प्रकार किती दिवसांपासून सुरू आहे, याची माहिती जाणून घेतली जात आहे.- मिलिंद भगत,सरपंच, सोनवाढोणा, ता.नेर

 

टॅग्स :Waterपाणी