शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

राष्ट्रसंतांवरील चित्रपट निर्मितीचे स्वप्न अधुरेच; राजदत्तांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 10:16 IST

संत गाडगेबाबा आणि डॉ.पंजाबराव देशमुखांवर मी चित्रपट केलेत. मात्र राष्ट्रसंतांवर चित्रपट निमिर्तीचे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकले नाही, अशी खंत प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देग्रामगीतेत समाजव्यवस्था बदलण्याची ताकद

संतोष कुंडकर।लोकमत न्यूज नेटवर्कवणी (यवतमाळ) : संत गाडगेबाबा, डॉ.पंजाबराव देशमुख आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या रुपाने विदर्भाने तीन ‘ख’ दिलेत. गाडगेबाबांनी खराट्याची, डॉ.पंजाबराव देशमुखांनी खडूची आणि राष्ट्रसंतांनी खंजिरीची महती सांगितली. संत गाडगेबाबा आणि डॉ.पंजाबराव देशमुखांवर मी चित्रपट केलेत. मात्र राष्ट्रसंतांवर चित्रपट निमिर्तीचे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकले नाही, अशी खंत प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वणी येथे आलेल्या राजदत्तांनी शनिवारी ‘लोकमत’शी दिलखुलास गप्पा केल्या. तुकडोजी महाराजांवरील चित्रपट निर्मिती हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असून राष्टसंतांनी सांगितलेल्या ग्रामगीतेत समाजव्यवस्था बदलण्याची ताकद आहे. त्यांच्या जीवनावर चित्रपट तयार झाला तर, तो चित्रपट निश्चितच परिणामकारक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासातील अनेक बाबी उलगडल्या. चित्रपटसृष्टीसारख्या मायावी जगात राहुनही त्याचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता अगदी ऋषीतुल्य जीवन जगणाऱ्या राजदत्तांची साधी राहणी आणि त्यांच्यातील सामाजिक जाणिवा सर्वांनाच अचंबीत करणाऱ्या आहेत. चित्रपटातून केवळ रंजन होऊ नये, त्यातून एखादा चांगला संदेशही समाजापर्यंत पोहचावा, ही त्यांची कायम भावना आहे.वर्धा शहरात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातून निघणाऱ्या एका दैैनिकात पत्रकार म्हणून कारकिर्द सुरू केल्यानंतर पुढे चित्रपटसृष्टीत कसा प्रवेश झाला, याची रंजक कथाच राजदत्तांनी सांगितली. ते म्हणाले, पत्रकारितेला सुरूवात केल्यानंतर एक-दीड वर्षांतच ते दैैनिक बंद पडले. वडिल रेल्वेत नोकरीवर असले तरी परिस्थिती बिकट असल्याने वडिलांकडूनही आर्थिक मदत मिळत नव्हती. त्यामुळे थेट मद्रास गाठले. तेथे मुलांसाठी असलेल्या ‘चांदोबा’ या पाक्षिकात भाषांतरकार म्हणून नोकरी मिळाली. त्यावेळी हे पाक्षिक १२ भाषांमध्ये प्रकाशित व्हायचे. अनेक दिवस तेथे काम केल्यानंतर त्या ठिकाणीही मन रमेना. अशातच मद्रास येथे काही कामानिमित्त आलेल्या राजा परांजपेची भेट झाली. त्यांच्यापुढे मनातील भावना व्यक्त केल्या. चित्रपटासाठी काम करायची इच्छा त्यांच्यापुढे प्रगट केली आणि राजा परांजपेंनी मला पुन्हा पुण्यात नेले. तेथे त्यांनी ‘मधुचंद्र’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी दिली.विनोदी धाटणीचा हा पहिलाच चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतला. मात्र त्यानंतर मला अनेक महिने कामच मिळाले नाही. नंतर कोल्हापूर गाठले. तेथे राजा परांजपेंचे गुरू भालजी पेंढारकर यांची भेट घेतली. त्यांचा सहाय्यक म्हणून काम करण्याची ईच्छा त्यांच्यापुढे व्यक्त केली. मात्र सहाय्यक म्हणून काम करशील तर सहाय्यकच राहशील, असा वडिलकीचा सल्ला भालजींनी राजदत्तांना दिला.हाती काम नव्हते. खिशात पैैसे नव्हते. ही परिस्थिती त्यांना सांगितली. तेव्हा भालजींनी पटकथांमधील नोटस् काढण्याची जबाबदारी राजदत्तांवर सोपविली. पुढे भालजींनी स्वत: निर्मिती केलेल्या ‘घरची राणी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविली. या चित्रपटाला महाराष्ट शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला. येथून कधीच मागे वळून पाहिले नाही. अपराध, अरे संसार संसार, देवकीनंदन गोपाला, भोळी भाबडी, सर्जा, मुंबईचा फौैजदार, राघुमैैना, शापित, पुढचं पाऊल, झेप, देवमाणूस, भालू, अर्धांगिनी, अष्टविनायक यांसह ३१ चित्रपटांचे दिग्दर्शन मी केले, अशी माहिती राजदत्तांनी दिली. यांपैैकी तीन चित्रपटांना राष्टपती पुरस्कार तर १३ वेळा महाराष्ट शासनाचा पुरस्कार मिळाला असल्याचे ते म्हणाले.

‘राजदत्त’ नावातील गुपीतराजदत्तांचे मूळ नाव दत्तात्रय अंबादास मायाळू असे आहे. परंतु गुरूप्रती असलेल्या अफाट श्रद्धेतून चित्रपट क्षेत्रातील त्यांचे गुरू राजा परांजपे यांच्या नावातील राज आणि स्वत:च्या नावातील दत्त या शब्दांना एकत्रित करून त्यांनी स्वत:चे नाव राजदत्त असे करून घेतले. चित्रपट सृष्टीत त्यांना आजही याच नावाने ओळखले जाते.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघ