शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बनण्याचे स्वप्न भंगले, बनला चक्क खुनात आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:00 IST

लोहारातीलच एका दिवंगत भाईचे पंटर म्हणून चव्हाण बंधूंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. तोच दरारा कायम ठेवला. दरम्यान सिद्धार्थ वानखडे व देवा यांच्यात वाद नव्हता. एका जुगाराच्या डावात देवा व सिद्धू यांच्यात वादाची ठिणगी पडली. यातून प्रतिस्पर्धी समर्थकांना मारहाण सुरू झाली. हे प्रकरण पुढे वाढतच गेले. त्यातून खून झाले. दरम्यान चव्हाण बंधूचा भैया यादव सोबतही वाद झाला, त्यालाही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ठळक मुद्देलोहारातील देवा चव्हाण हत्याकांड : सात वर्षांपूर्वीच्या जुगारातील भांडणाने पेटला सुडाग्नी

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोहारासारख्या छोट्याशा गावात थेट टोळीयुद्ध भडकावं याची कारणं काय याचा शोध घेतला असता भयान वास्तव पुढे आले. पोलीस बनण्याची स्वप्न पाहत मेहनत करणारा युवक कळत न कळत गुन्हेगाराच्या हातात लागला आणि तो खुनातील आरोपी बनला. त्याचा हा प्रवासच गुन्हेगारी जगतातील वास्तव मांडणारे आहे.देविदास उर्फ देवा निरंजन चव्हाण (२६) या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाचा भररस्त्यात खून झाला. देवा व दुर्गेश हे दोन्ही भाऊ लोहारा परिसरात गुन्हेगार म्हणून परिचित आहे. त्यासोबतच सिद्धार्थ उर्फ सिद्धू रामदास वानखडे (३६) हा ही सक्रिय गुन्हेगार आहे. दीपक उर्फ भैया राममनोहर यादव (३५) याचा गुन्हेगारी जगताशी थेट संबंध असून अवैध दारू विक्री हा व्यवसाय आहे.लोहारातीलच एका दिवंगत भाईचे पंटर म्हणून चव्हाण बंधूंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. तोच दरारा कायम ठेवला. दरम्यान सिद्धार्थ वानखडे व देवा यांच्यात वाद नव्हता. एका जुगाराच्या डावात देवा व सिद्धू यांच्यात वादाची ठिणगी पडली. यातून प्रतिस्पर्धी समर्थकांना मारहाण सुरू झाली. हे प्रकरण पुढे वाढतच गेले. त्यातून खून झाले. दरम्यान चव्हाण बंधूचा भैया यादव सोबतही वाद झाला, त्यालाही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो सुदैवाने अपयशी ठरला. या कालावधीत गुन्हेगारी जगतापासून अलिप्त असलेला सिद्धांत राजेश रावेकर (२८) हा आपला परंपरागत चिकन विक्रीचा व्यवसाय सांभाळून पोलीस भरतीसाठी जीवापाड मेहनत करीत होता. दोन वेळा पोलीस भरतीत त्याला फार कमी गुणांनी बाहेर पडावे लागले. मात्र त्यांने जिद्द सोडली नव्हती. तो आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करीत होता.लोहारातील दोन टोळ्या उदयास आल्या. त्यात सिद्धू वानखडे याच्या टोळीला शारदा चौक परिसरातून पाठबळ मिळाले. तर चव्हाण बंधूंना मोहा फाटा येथून पाठबळ मिळाले. या जोरावर मारहाणीपर्यंतचे शत्रूत्व थेट अस्तित्व संपविण्यापर्यंत पोहोचले. या दोन गुन्हेगारी टोळ्यांच्या संघर्षात कधी सिद्धांत रावेकर याचा वापर झाला हे त्यालाही कळले नाही. पोलीस बनण्याचे स्वप्न पाहणारा सिद्धांत कायद्याला मानणारा व इमाने इतबारे दैनंदिन दिनचर्या सांभाळणारा होता. मात्र चव्हाण बंधू व वानखडे यांच्यातील एका भांडणात सिद्धांत रावेकर याच्यावरही ३०७ चा गुन्हा दाखल झाला. आता आपण काहीही झाले तरी पोलीस होणार नाही, आपले आयुष्य धुळीला मिळविले याची त्याला जाणीव झाली. ज्याच्यामुळे स्वप्न भंगले त्याचा सूड घ्यायचा अशी भावना त्याच्यात निर्माण झाली व चव्हाण बंधूच्या विरोधकांनी त्याला सोईस्कर हवा दिली. यातूनच देवा चव्हाण याच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि देवाच्या वर्मावर घाव घालण्याचा प्रण सिद्धांतने उचलला. हाच फायदा सक्रिय गुन्हेगार असलेल्या सिद्धू वानखडे, भैया यादव या गुन्हेगारांनी घेतला.बुधवार २६ आॅगस्टला देवा चव्हाण याचा पाठलाग सुरू झाला. देवाचा भाऊ सोहेलच्या खुनात कारागृहात आहे. त्यामुळे देवाला संपविणे सहज शक्य आहे, हे हेरुनच सिद्धार्थ व भैया यादवने फिल्डींग लावली. त्यासाठी वापर केला सिद्धांत रावेकर याचा. भैया यादवने कारने देवाच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर सिद्धांतने भररस्त्यात सत्तुराने देवाचा गळा कापला. उर्वरित तिघांनी इतर अवजारांनी वार केले. यात देवा जागीच गतप्राण झाला. यवतमाळच्या गुन्हेगारीत अशाच पद्धतीने सक्रिय गुन्हेगारांकडून नवख्यांचा वापर केला जात आहे. भावनात्मक करून त्याच्या हातून काम साध्य केले जात आहे. सिद्धांत रावेकर सारखे अनेक जण सक्रिय गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात.सहकाऱ्यासमोरच चिरला गळादेवा चव्हाण याला आपल्यावर हल्ला होणार याची कुणकुण लागली होती. त्यामुळे घराबाहेर पडताना पाच ते सात जणांना सोबत घेऊनच निघत होता. घटना घडली त्यावेळीही देवासोबत त्याचे साथीदार होते. कारने धडक दिल्यानंतर देवाने साथीदारांना पळण्याचा इशारा केला. त्याने स्वत:ही पायातील बुट काढून पळायला सुरुवात केली. मात्र त्याची दिशा चुकली. साथीदार ज्या दिशेला गेले त्याच्या विरुद्ध दिशेला देवा पळाला व मारेकऱ्यांच्या हाती लागला.

टॅग्स :Murderखून