हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:50 AM2021-09-17T04:50:21+5:302021-09-17T04:50:21+5:30

महागाव : हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील दर्देवाडी येथे बुधवारी ...

Dowry harassment leads to marital suicide | हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या

हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या

Next

महागाव : हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील दर्देवाडी येथे बुधवारी रात्री ११ वाजता घटना घडली.

सुजाता परमेश्वर नांदे (२०), असे मृत विवाहितेचे नाव आहे. माळहिवरा हे सुजाताचे माहेर आहे. दीड वर्षांपूर्वी तिचा विवाह दर्देवाडी येथील परमेश्वर प्रकाश नांदे याच्याशी झाला. काही दिवस सुखाचे गेल्यानंतर सासू रेणुका प्रकाश नांदे, पती परमेश्वर नांदे, नंदई भारत मेंडके यांच्याकडून तिचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात येऊ लागला. चार महिन्यांपूर्वी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ती ओली बाळंतीण असतानाही तिला शेतीच्या कामाला जुंपण्यात आले.

तिच्या पतीने मोटरसायकल खरेदी करण्यासाठी २५ हजारांची मागणी केली. ती सुजाताचे वडील लक्ष्मण बोडके यांनी पूर्ण केली. लग्नातही ४० हजार रुपये आणि संसारोपयोगी वस्तू भेट दिल्या. मात्र, तिचा हुंड्यासाठी छळ सुरूच होता. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी गुरुवारी तक्रार दिल्यानंतर आरोपी पती परमेश्वर प्रकाश नांदे, सासू रेणुका नांदे, नंदई भारत मेंडके (रा. मोरचंडी) यांच्याविरुद्ध भादंवि ४९८, ३०४ (ब), ३०६ आणि ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. दोन आरोपींना अटक केल्याची माहिती ठाणेदार विलास चव्हाण यांनी दिली.

Web Title: Dowry harassment leads to marital suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.