शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अनैतिक संबंधातून विधवेचा विळ्याने खून

By admin | Updated: December 31, 2016 01:06 IST

अनैतिक संबंधाच्या कारणावरून विधवा महिलेचा विळ्याचे वार करून निर्घृण खून करण्यात

सासू, दिराला अटक : प्रियकराला फसवू पाहणारा फिर्यादीच निघाला आरोपी हिवरासंगम : अनैतिक संबंधाच्या कारणावरून विधवा महिलेचा विळ्याचे वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना महागाव तालुक्याच्या हिवरासंगम येथे शुक्रवारी उघडकीस आली. वंदना उर्फ अनिता अशोक चवरे (३०) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी तिचा दीर पिंटू उर्फ प्रकाश दगडू चवरे व सासू सिंधूबाई दगडू चवरे यांना महागाव पोलिसांनी खुनाच्या आरोपात अटक केली. गुरुवारी रात्रीच अनिताचा खून करण्यात आला. शुक्रवारी पहाटे अनिताचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत तिच्याच अंगणात आढळून आला. तिच्या अंगावर विळ्याचे वार करण्यात आले होते. हा विळा तिच्या मृतदेहाशेजारीच पडून होता. अनिताचा दीर प्रकाश चवरे याने महागाव पोलिसांकडे खुनाच्या या घटनेची सकाळीच फिर्याद नोंदविली. शिवाय या खून प्रकरणी अनिताचे अनैतिक संबंध असलेल्या गावातीलच बंडू वारंगे याच्यावर संशय व्यक्त केला. महागावचे ठाणेदार करीम मिर्झा यांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा रक्ताचे डाग प्रकाशच्या घरापर्यंत आढळून आले. त्यामुळे पोलिसांना प्रकाशवर संशय बळावला. अखेर ‘बाजीराव’ दाखविताच प्रकाशने गुन्हा कबूल केला आणि खुनाच्या या प्रकरणात मृताच्या प्रियकराला फसवू पाहणारा फिर्यादी दीरच आरोपी निघाला. पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल (आयपीएस) यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, अनिता चवरे हिच्या पतीने पाच वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. सासू सोबत पटत नसल्याने ती मुलगा देवानंद (९) व मुलगी ऋतुजा (७) यांच्यासह शेजारीच वेगळी राहत होती. त्यांच्या बाजूलाच सासू व दीर राहत होते. अनिताचे गावातीलच बंडू काळूराम वारंगे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा सासूला संशय होता. याच कारणावरून सासू-सुनेचे नेहमी भांडण व्हायचे. सासूने या अनैतिक संबंधाबाबतचा संशय तंटामुक्त समितीकडे लेखी स्वरूपात व्यक्त केला होता. दरम्यान गुरुवारच्या रात्री अनिताचा खून करण्यात आला. तिची मुलगी या खुनाची साक्षीदार असावी, असा पोलिसांना संशय आहे. सकाळी खून झाल्यानंतर अवघ्या काही तासातच तपास चक्रे फिरवून महागावचे ठाणेदार करीम मिर्झा यांनी खुनाचा छडा लावला आणि दोनही आरोपींना गजाआड केले. सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, फौजदार पावरा, बिट जमादार देवाशिष पवार, पोलीस कर्मचारी युवराज जाधव, प्रशांत, सुरेश पवार, महिला पोलीस शिपाई किरणताई आडे आदी या तपासात मदत करीत आहे. (वार्ताहर)