शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे दुहेरी हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 14:53 IST

उसनवारीच्या पैशावरून झालेल्या भोसकाभोसकीत दोघांचा खून झाल्याची घटना बुधवारी पहाटे यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव रोडवरील प्रेमनगरात घडली.

ठळक मुद्देएकमेकांना भोसकलेउसनवारीच्या पैशातून वाद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उसनवारीच्या पैशावरून झालेल्या भोसकाभोसकीत दोघांचा खून झाल्याची घटना बुधवारी पहाटे येथील बाभूळगाव रोडवरील प्रेमनगरात घडली. आशिष गायकवाड यांच्या घराच्या शेडमध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला.मृतांमध्ये विश्वजित प्रकाश बुरबुरे (३०) रा. तिरझडा व वैभव उर्फ डोमा लक्ष्मण राऊत (२७) रा. बाभूळगाव हल्ली मुक्काम कळंब यांचा समावेश आहे. मृत डोमा राऊत हा आशिष गायकवाड यांचेकडे काम करायचा. त्याच्याच घरी त्याचे वास्तव होते. आशिष गायकवाड यांनी विश्वजित बुरबुरे याला ३० हजार रुपये उसनवार दिले होते. पैसे वसुल करण्याचे काम डोमा राऊत करायचा. डोमा राऊत याने विश्वजितकडे पैसे परत करण्याविषयी काही दिवसापासून तगादा लावला होता. याच रागातून विश्वजीत याने पहाटे तीन वाजताच्या सुमारास डोमा राहत असलेल्या आशिष गायकवाड यांचे घर गाठले. तेथे त्याचे धारदार शस्त्राने डोमावर वार करण्यात आले. प्रतिहल्ला चढविण्यासाठी डोमा राऊतने विश्वजितच्या हातातील शस्त्र हिसकाऊन त्याचेवर वार केले.

या झटापटीत दोघेही गंभीर जखमी झाले. विश्वजीत बुरबुरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर डोमा राऊत याला गंभीर अवस्थेत यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी तक्रार मृताचे वडील प्रकाश बुरबुरे यांनी कळंब ठाण्यात दिली. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. घटनेची माहिती होताच ठाणेदार विजय राठोड यांनी आपल्या स्टापसह घटनास्थळ गाठले. फॉरेसींग इनव्हेस्टींगेशन टिमने घटनास्थळ गाठून तेथील काही वस्तू ताब्यात घेतल्या. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.उसनवार पैशातून खून- ठाणेदारआशिष गायकवाड यांनी दिलेल्या व्याजाचे पैसे वसूल करण्याच्या भानगडीत दोघांचा खून झाला. प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहीती ठाणेदार विजय राठोड यांनी दिली.

टॅग्स :Murderखून