शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अडीच लाख बालकांना डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन दिवस चार लाख ७२ हजार २४५, तर शहरी भागात पाच दिवस एक लाख १४ हजार ९८२ घरे, अशा एकूण पाच लाख ८७ हजार २२७ घरांना गृहभेटीचे नियोजन आहे. यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात बुथनिहाय नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात दोन हजार ३५२ आणि शहरी भागात २९०, असे एकूण दोन हजार ४६२ बुथ तयार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । पोलिओ निर्मूलन, आज जिल्ह्यात लसीकरण मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सुमारे दोन लाख ६५ हजार बालकांना रविवारी पोलिओचा डोज दिला जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने तयारी केली आहे.जिल्ह्यात १९९८ पासून ‘वाईल्ड पोलिओ व्हायरस’ आढळलेला नाही. मात्र तरीही केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार रविवार १९ जानेवारीला जिल्ह्यात पोलिओ निर्मूलन मोहीम राबविली जात आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अपेक्षित दोन लाख आठ हजार ४९९ आणि शहरी भागातील ५६ हजार ७५४, अशा एकूण दोन लाख ६५ हजार २५३ बालकांना पोलिओ लस देण्याचे नियोजन केले आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून आरोग्य विभागाने गृहभेटी केल्या.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन दिवस चार लाख ७२ हजार २४५, तर शहरी भागात पाच दिवस एक लाख १४ हजार ९८२ घरे, अशा एकूण पाच लाख ८७ हजार २२७ घरांना गृहभेटीचे नियोजन आहे. यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात बुथनिहाय नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात दोन हजार ३५२ आणि शहरी भागात २९०, असे एकूण दोन हजार ४६२ बुथ तयार करण्यात येणार आहे. यात प्रत्येकी तीन सदस्य बुथची संख्या एक हजार ३०८, दोन सदस्य बुथची संख्या एक हजार ४०८ आहे. यासाठी परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून एकूण सहा हजार ५९२ मनुष्यबळ वापरले जाणार आहे. गृहभेटीसाठी एक हजार २४३ टीम गठित करण्यात आल्या आहे. यात ग्रामीण भागात एक हजार १२, तर शहरी भागात २३१ टीमचा समावेश आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेकरिता जिल्ह्यात १८ हजार व्हायल्स, दोन हजार ४५ व्हॅक्सीन कॅरिअर, १० हजार १३६ आईस पॅक्स, १०५ आयएलआर, ११६ डिपफ्रिज, १३१ कोल्ड बॉक्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. ट्रांझिट व मोबाईल टीमचा कृती आराखडासुद्धा तयार करण्यात आला. अतिजोखमेच्या कार्यक्षेत्रासाठी १२३ मोबाईल टीम आहे.पालकांना आवाहनरविवार, १९ जानेवारीला जिल्ह्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. सर्व पालकांनी रविवारी आपल्या ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओची लस देऊन या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी व्हावे व ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. 

टॅग्स :Healthआरोग्य