शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या भरपाईत राज्यात अटी शर्तींचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 11:20 IST

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने हिवाळी अधिवेशनात घोषित केलेली भरपाई उन्हाळी अधिवेशन सुरू होऊनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

ठळक मुद्दे३० हजारांतील २४ हजाराला मुकणारपीक सर्वे आणि मदत वाटपाच्या निकषात तफावत

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने हिवाळी अधिवेशनात घोषित केलेली भरपाई उन्हाळी अधिवेशन सुरू होऊनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. विशेष म्हणजे, अधिवेशनाच्या तोंडावर शासनाने मदतीचे दर जाहीर करताना अटी-शर्तींचा खोडा घातला आहे. महत्त्वाचे म्हणजे, एनडीआरएफच्या निकषानुसार पीक सर्वेक्षण झालेले असताना, मदत वाटपासाठी मात्र पीक विमा कंपनीचे निकष वापरण्यात आले. घोषित ३० हजारांपैकी २४ हजारांची मदत केवळ घोषणाच ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नागपूर अधिवेशनात बागायती क्षेत्रासाठी ३७ हजार आणि जिरायती क्षेत्रासाठी ३० हजार रुपये प्रतिहेक्टर जाहीर झाले. मात्र, हे पैसे राज्यशासन, पीक विमा कंपनी आणि बियाणे कंपनी अशा तिघांकडून मिळेल, असे नंतर स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात २३ फेब्रुवारीला राज्य शासनाने जीआर निर्गमित करून आपल्या वाट्याचे १३,५०० आणि ६,८०० जाहीर केले. एकीकडे मदत जाहीर करतानाच शासनाने उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना मिळणारच नाही, अशी तरतूद केली.शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा सर्व्हे हा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संचालनालयाच्या (एनडीआरएफ) निकषानुसार करण्यात आला. त्यानुसार कृषी विभागाच्या मंडळनिहाय कापसाची पाहणी करण्यात आली. परंतु, जाहीर केलेल्या मदतीचे वाटप हे पीक विमा कंपनीच्या निकषानुसार शासनाने जाहीर केले आहे. या तफावतीचा फटका लाखो शेतकऱ्यांना बसणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या पीक कापणी प्रयोगानुसार ज्या मंडळात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान आहे, तेथील शेतकऱ्यांनाच मदत मिळणार आहे. त्यामुळे इतर मंडळातील शेतकरी मदतीला मुकणार आहे.शुक्रवारी केवळ एनडीआरएफचे ७५ टक्के आणि राज्यशासनाचे २५ टक्के मिळून ६८०० आणि १३५०० इतक्याच मदतीचा जीआर काढण्यात आला. उर्वरित रक्कम विमा कंपनी आणि बियाणे कंपन्यांकडून वसूल करण्याची जबाबदारी चक्क बाधीत शेतकऱ्यांवरच लोटून शासनाने हात झटकले आहे. ही रक्कम देण्याची कार्यवाही कृषी विभागाने स्वतंत्रपणे करावी, असे जीआरमध्ये म्हटले आहे. मात्र, बियाणे कंपनीकडून भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांकडे मूळ पावती आणि लेबल किंवा बियाण्याचे रिकामे पाकीट असणे आवश्यक आहे. ते अनेकांकडे नाही.पावतीसह कृषी विभागाकडे प्रस्ताव दिल्यावर आणि तो विभागाने कंपनीकडे दिल्यावर तो मान्य होईलच याचीही शाश्वती नाही. अशा स्थितीत कोणत्याही शेतकऱ्याला बियाणे कंपनीविरुद्ध कोर्टात जाणे परवडणारे नाही. त्यामुळे ३० हजारांच्या घोषित मदतीपैकी २४ हजारांच्या रकमेवर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागणार आहे.

विम्याच्या रकमेवरही फेरणार पाणीबोंडअळीग्रस्तांसाठी शासनाने घोषित केलेल्या ३० हजारांच्या मदतीत पीक विम्याची रक्कम अंतर्भूत आहे. मात्र, सर्वेक्षणात ३३ नुकसानग्रस्त ठरलेल्या कोणत्या मंडळाला विमा कंपनी कोणता दर जाहीर करेल हे निश्चित नाही. शासनाने हजारापेक्षा कमी मदत मिळणार नाही, अशी किमान मर्यादा टाकली आहे. त्यामुळे विम्याचे दर हजारापेक्षा कमी आल्यास नुकसानग्रस्त मंडळातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणे दुरापास्त होणार आहे. दुसरे असे की, एखाद्या मंडळात कापसाचे नुकसान झाले असेल, मात्र विमा कंपनीने तेथे सोयाबीनसाठी मदत लागू केली असेल तर बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीला मुकावे लागणार आहे. त्यामुळे शासनाची ३० हजारांची घोषणाच पोकळ सिद्ध होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी