शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

लर्निंग लायसन्ससाठी हवे आता डाॅक्टरांचे मेडिकल सर्टिफिकेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

सध्या वैद्यकीय प्रमाणपत्र हे ५० रुपयांत टपरीवरच उपलब्ध आहे. एमबीबीएस डाॅक्टरांच्या नावाचा शिक्का मारून रजिस्ट्रेशन नंबरसह हे प्रमाणपत्र दिले जाते. आता नव्या प्रणालीनुसार लायसन्सकरिता मेडिकल प्रमाणपत्र देण्यासाठी डाॅक्टरांनाही यूझर आयडी घ्यावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ज्यांनी वयाची ४० वर्षं पूर्ण केली व त्यांना आता लर्निंग लायसन्स काढायचे आहे अशा व्यक्तींना वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच ट्रान्स्पोर्टिंगचे वाहन चालविण्याचा परवाना घेऊ इच्छिणाऱ्या सर्वच वयोगटातील व्यक्तीला डाॅक्टरांकडून तपासणी केलेले प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. शिकाऊ परवाना हा सारथी या पोर्टलवरून अर्ज करून काढता येतो. तेथेच ओटीपी जनरेट करून नोंदणी करता येते. या प्रक्रियेत आधारकार्ड लायसन्ससोबत लिंक होते. यातून संबंधित व्यक्तीची बायोमेट्रिक आयडेंटिटीही लायसन्ससोबत जोडली जाते. ही सर्व प्रक्रिया सुरक्षित व सहज सोपी अशी आहे.

ऑनलाइन लर्निंग लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रेशिकाऊ परवाना काढण्याकरिता कायमचा पत्ता असलेले दस्ताऐवज त्यात आधारकार्ड, वीजबिल व वयाचा पुरावा म्हणून दहावीच्या टीसीची झेराॅक्स आवश्यक आहे. आधारकार्ड परवान्यासोबत लिंक केले जाणार आहे.

यूझर आयडीसाठी डाॅक्टरांनाही कागदपत्रे आवश्यकसध्या वैद्यकीय प्रमाणपत्र हे ५० रुपयांत टपरीवरच उपलब्ध आहे. एमबीबीएस डाॅक्टरांच्या नावाचा शिक्का मारून रजिस्ट्रेशन नंबरसह हे प्रमाणपत्र दिले जाते. आता नव्या प्रणालीनुसार लायसन्सकरिता मेडिकल प्रमाणपत्र देण्यासाठी डाॅक्टरांनाही यूझर आयडी घ्यावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

टपरीवरचे वैद्यकीय प्रमाणपत्र सुरूच

राज्याच्या मेडिकल काैन्सिलकडे नोंदणीकृत डाॅक्टरचेच वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, हे प्रमाणपत्र आरटीओ कार्यालयाबाहेर टपरीवरच उपलब्ध आहे. 

आठवडाभरात घरपोहोच लायसन्स- सारथी पोर्टलवरून परवान्यासाठी अपाॅइंटमेंट घेता येते. नंतर निश्चित तारखेला जाऊन आरटीओ अधिकाऱ्यांसमोर परीक्षा द्यावी लागते. आठ दिवसात परवाना घरपोहोच येतो.

नव्या प्रणालीमुळे शिकाऊ परवाना मिळणे सहज सोपे झाले आहे. सारथी पोर्टलचा वापर करून कुणीही घरबसल्या अपाॅइंटमेंट घेऊ शकतो. शिवाय गर्दीही टाळता येते. वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.  - दीपक गोपाळे, सहाय्यक परिवहन अधिकारी

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस