शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘मेडिकल’च्या प्रसूती विभागात डॉक्टरांची अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:39 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूत विभागात अनियंत्रित कारभार सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांना येथे अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जाते. मंगळवारी रात्री महागाव येथून आलेल्या गर्भवतीला अक्षरश: हाकलून देण्यात आले.

ठळक मुद्देगर्भवतीला काढले बाहेर : रात्री २ वाजताची घटना, कारागृह अधीक्षकांसोबत गैरवर्तन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूत विभागात अनियंत्रित कारभार सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांना येथे अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जाते. मंगळवारी रात्री महागाव येथून आलेल्या गर्भवतीला अक्षरश: हाकलून देण्यात आले. यावेळी कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्याशीही असभ्य वर्तन उपस्थित डॉक्टरांनी केले. या घटनेची शहर ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.महागाव येथील संगीता विशाल डहाळे यांना प्रसूतीसाठी यवतमाळ रेफर करण्यात आले. रक्ताचे प्रमाण कमी असल्याने महागावातील डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. असह्य वेदना होत असल्याने संगीता डहाळे यांना कुटुंबीयांनी मंगळवारी रात्री १० वाजता मेडिकलच्या प्रसूती वार्ड क्र. ३ मध्ये आणले. संगीता वेदनेने तडफडत असताना येथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिच्याकडे बघितलेसुद्धा नाही. नातेवाईक असल्याने यवतमाळ जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांना याची माहिती मिळाली. त्यांनी थेट शासकीय रुग्णालयातील प्रसूती वार्ड गाठला. तेथील डॉक्टरांना संगीताची प्रकृती कशी आहे याबाबत विचारणा केली. यावरून त्यांनी अतिशय उर्मट पणाचे उत्तर दिले. येथे थांबू नका, पलिकडे वार्डात जागा मिळेल तेथे झोपा, आत्ताच काही होणार नाही, असे सांगून अक्षरश: बाहेर काढले. ज्या ठिकाणी झोपण्यास सांगितले तेथे एकही बेड उपलब्ध नव्हता. जमिनीवर झोपण्यासाठी गादीही देण्यात आली नाही. याबाबत कारागृह अधीक्षक चिंतामणी यांनी डॉक्टरांकडे विचारणा केली असता अश्लाघ्य शब्दाचा वापर करीत अक्षरश: हाकलून देण्यात आले.रुग्ण खासगीत घेऊन जा असे म्हटले. मात्र त्यासोबतच रुग्णांचे फाईल देण्यास त्या डॉक्टरांनी नकार दिला. अखेर नाईलाजाने प्रचंड वेदनेने तडफडत असताना तिसऱ्या माळ्यावरुन संगीता डहाळे यांना त्यांच्या पतीने व्हील चेअरची शोधाशोध करून खाली आणले. रात्री १० वाजता आले तेव्हाही रुग्णालयात एकही कक्ष सेवक स्ट्रेचर अथवा व्हील चेअर देण्यास तयार नव्हता. या गंभीर प्रकाराने त्रस्त झालेल्या कारागृह अधीक्षक यांनी रुग्णालयाचे अधीक्षक कुलकर्णी यांच्याकडे फोनवरून तक्रार केली. मात्र त्यानंतर प्रसूती विभागातील डॉक्टरांचे वर्तन अधिकच बेजाबदारपणाचे व अपमानास्पद असल्याचे चिंतामणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.या गंभीर प्रकाराची शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. चौकशी करून मंगळवारी रात्री १० वाजता प्रसूती विभागात कर्तव्यावर असणाऱ्या पाच डॉक्टरांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात किर्ती चिंतामणी यांची तक्रार आल्याचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी सांगितले.महिला डॉक्टरने दिली होती मारण्याची धमकीमेडिकलच्या प्रसूती विभागात ग्रामीण महिलांवर सातत्याने अन्याय होतो. येथे काही दिवसांपूर्वी महिला डॉक्टरने चक्क प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला हातपाय तोडून मारण्याची धमकी दिली होती. या डॉक्टरची अधिष्ठात्यांनी हकालपट्टी केली. त्यानंतर एकाच वेळी १४ महिलांना शस्त्रक्रियेच्या जागेवर संसर्ग झाला होता. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे मेडिकलच्या प्रसूती विभागात महिला बळी पडत आहे. त्यानंतर आता थेट जिल्हा कारागृह अधीक्षक असलेल्या कीर्ती चिंतामणी यांनाच येथील कटू अनुभव आला आहे.

टॅग्स :Yawatmal Medical Collegeयवतमाळ मेडिकल कॉलेज