शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
4
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
5
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
6
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
8
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
9
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
10
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
11
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
12
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
13
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
14
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
15
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
16
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
17
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
18
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
19
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
20
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कन्या किरण व पूजा होणार डॉक्टर

By admin | Updated: July 23, 2016 00:03 IST

बारावीच्या परीक्षेत दोन सख्या बहिणी गुणवत्ता यादीत झळकल्या. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतही अव्वल ठरल्या. त्यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबरही लागला.

चेतना अभियानातून मदत : आर्थिक अडचणीने रखडलेला वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा रूपेश उत्तरवार यवतमाळ बारावीच्या परीक्षेत दोन सख्या बहिणी गुणवत्ता यादीत झळकल्या. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतही अव्वल ठरल्या. त्यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबरही लागला. परंतु आर्थिक अडचणींमुळे या शेतकरी कन्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली. अशा वेळी बळीराजा चेतना अभियान या शेतकरी कन्यांच्या मदतीला धावून आले. अभियानाच्या माध्यमातून गोळा झालेल्या लोकवर्गणीतून त्यांना प्रवेशासाठी निधी दिला जाणार आहे. यामुळे शेतकरी कन्यांचा डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. किरण सुभाष गायकवाड आणि पूजा सुभाष गायकवाड या नेर नबाबपूर येथील भगिनी. बारावीच्या परीक्षेत किरण गतवर्षी ८७ टक्के गुण घेऊन बारावी उत्तीर्ण झाली तर पूजा ९०.१५ टक्के गुण घेऊन यंदा विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाली. या दोघींनी यंदा वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा दिली. किरणला सीईटी परीक्षेत १६४ तर पूजाला १७७ गुण मिळाले. किरणचा गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि पूजाचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला. परंतु अल्पभूधारक शेतकरी असलेल्या या दोनही कन्यांचा मेडिकल प्रवेश आर्थिक अडचणीमुळे रखडला होता. सुभाष गायकवाड यांना २००७ मध्ये दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून एक हेक्टर ६१ आर जमीन मिळाली होती. त्याच भरोश्यावर कुटुंबाचा गुजरान करीत होते. त्यांच्या दोनही गुणी लेकींनी बारावीत आणि वैद्यकीय पूर्व परीक्षेत नाव चमकविले. परंतु या गुणी मुलींच्या प्रवेशासाठी पैसे आणायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला. कुणी तरी त्यांंना बळीराजा चेतना अभियानाची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी थेट यवतमाळ गाठून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांची भेट घेतली. त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापुढे आपली आपबिती कथन केली. जिल्हाधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता या दोन भगिनींच्या प्रथम वर्षाच्या शुल्कासाठी बळीराजा चेतना अभियानातून गोळा झालेल्या लोकवर्गणीतून निधी देण्याचे मान्य केले. यामुळे या दोन भगिनींचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे.