शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मोदकाचे किती प्रकार आहेत माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 17:06 IST

Yavatmal : मोदक बनविण्याचे नानाविध प्रकार बाजारात

यवतमाळ : गणरायाला प्रसाद म्हणून वाटले जाणारे मोदक आता विविध प्रकारात बाजारात दाखल झाले आहेत. दूध उत्पादक कंपन्यांनी मागणी लक्षात घेता मोदकाचे विविध प्रकार बाजारात आणले आहेत. यात उकडीच्या मोदकाला सर्वाधिक मागणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत मोदकाच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. मात्र काही प्रमाणात मोदकाचा आकार कमी झाला आहे. यासोबतच मोदक बनविण्यासाठी विविध कौशल्याचा वापर करण्यात आला आहे.

चॉकलेट मोदकही आले मोदकाची मागणी लक्षात घेता व्यावसायिकांनी मोदक बनविण्याचे नानाविध प्रकार बाजारात आणले आहेत. यामध्ये काजू मोदक, मलाई मोदक, खोबरा मोदक, उकडीचे मोदक, गूळ खोबऱ्याचे मोदक, पुरण मोदक यासह चॉकलेट मोदकहीं बाजारात विक्रीसाठी आले आहेत.

साईज झाली प्रभावित मोदकाच्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य महागले आहे. मात्र यानंतरही गणेश भक्तांच्या खिशाला झळ पोहोचू नये म्हणून मोदकाच्या किमती कायम ठेवण्यात आल्या आहेत. यात मोदकाची साईज मात्र कमी करण्यात आली आहे.

गूळ खोबऱ्याच्या मोदकाला मागणी बाजारात गूळ आणि खोबरे यापासून तयार झालेल्या मोदकाला सर्वाधिक मागणी आहे. मोदक बनविण्यासाठी साचाचा वापर करण्यात आला आहे. गूळ, खोबरे आणि कणिकपासून बनवलेले मोदक बाजारात आहे.

मोदकाचे दर काय बाजारात सर्वाधिक २०० रूपये दर काजू मोदकाला आहे. मलाई मोदक १५०, खोबरा मोदक १००, गूळ खोबरा मोदक १२० रूपये, उकडीचे मोदक ३० रूपये नग दराने विकले जात आहे.

मोदक विक्रेते म्हणतात.... "ग्राहकांच्या मागणीनुसार मोदकाचे विविध प्रकार तयार केले जातात. यात अधिकाधिक गुणवत्ता देण्यावर भर देण्यात आला आहे. दर मात्र जैसे थेच ठेवण्यात आले आहेत." - भालचंद्र रानडे, यवतमाळ

 

टॅग्स :YavatmalयवतमाळGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024