शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महसूलचे कामकाज तलाठी भवनातून करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 21:32 IST

राज्यात केवळ यवतमाळ जिल्ह्यात अस्तित्वात आलेल्या तलाठी भवनांचा वापर होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. याची दखल घेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी महसूल विभागाचे ग्रामीण भागातील कामकाज तलाठी भवनातून झाले पाहिजे यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देसंजय राठोड : नागरिकांच्या तक्रारीवरून प्रशासनाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात केवळ यवतमाळ जिल्ह्यात अस्तित्वात आलेल्या तलाठी भवनांचा वापर होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. याची दखल घेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी महसूल विभागाचे ग्रामीण भागातील कामकाज तलाठी भवनातून झाले पाहिजे यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.तलाठी भवन शोभेच्या वास्तू ठरल्याची तक्रार अनेक ठिकाणी नागरिक करीत आहेत. शासनाने नागरिकांच्या सोईसाठी दिलेल्या वास्तू वापरात आल्याच पाहिजे, त्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आढावा घेऊन जिल्ह्यातील किती तलाठी या भवनांमधून कामकाज करतात, याचा अहवाल मागविला आहे.महसूल विभागाशी शेतकरी, विद्यार्थी, सामान्य जनता यांचा दररोजचा संबंध येतो. एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा प्रभार असल्याने त्यांचे बसण्याचे निश्चित ठिकाण नव्हते. त्यामुळे तलाठ्यांच्या सर्व महसूली कामांचे विकेद्र्रीकरण करून ते नागरिकांना ठराविक वेळेत एका जागेवर भेटावे, त्यातून जनतेच्या अडचणी, त्यांचे दाखले, प्रमाणपत्रं आदी कामांचा निपटारा व्हावा, हा तलाठी भवनाचा उद्देश आहे. शिवाय अनेक गावात तलाठी किरायाने खोली करून तेथून कामकाज करायचे. मात्र त्याचे भाडे वषार्नुवर्षे थकीत राहत असल्याचे प्रकारही निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून गावात तलाठी भवन बांधण्याचा निर्णय ना. संजय राठोड यांनी घेतला. कोणत्या गावांमध्ये तलाठ्यांना कामकाजासाठी खासगी जागा, खोली भाडेपट्टीने घेतली, कोणाचे भाडे थकीत आहे, याचा अहवालही ना. राठोड यांनी जिल्हाधिकाºयांना मागितला आहे.बांधकाम पूर्ण करून हस्तांतरणाचे आदेशअपूर्ण तलाठी भवनाचे काम बांधकाम विभागाने तातडीने पूर्ण करून महसूल विभागाकडे हस्तांतरित करावे, अशा सूचनाही ना.राठोड यांनी केल्या. तलाठी भवनाच्या देखरेखीचे काम गावातील कोतवालांकडे सोपविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड