शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेपूर्वी दारूबंदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:30 IST

दारूबंदी न केल्याने समाज व्यवस्था डळमळीत झाली आहे. मात्र सरकारला त्याची चिंता नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दारूबंदीचे लेखी आश्वासन घ्या. सरकारने आचारसंहितेपर्यंत दारूबंदी न केल्यास अशा लोकांना मतदानही करू नका, ......

ठळक मुद्देमेधा पाटकर : दारूबंदीसाठी हजारो महिलांचा महामोर्चा, ‘त्यांना’ मतदान करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारूबंदी न केल्याने समाज व्यवस्था डळमळीत झाली आहे. मात्र सरकारला त्याची चिंता नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दारूबंदीचे लेखी आश्वासन घ्या. सरकारने आचारसंहितेपर्यंत दारूबंदी न केल्यास अशा लोकांना मतदानही करू नका, असा नारा नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी स्वामिनीसह विविध संघटनांच्या मदतीने काढलेल्या मोर्चात दिला.जिल्हा दारूबंदीच्या मागणीसाठी शुुक्रवारी हजारोे महिलांनी एकत्र येत यवतमाळात महामोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना मेधा पाटकरांनी सरकारवर सडकून टीका केली. सरकारला जनतेचे काहीही देणेघेणे नाही, स्वत:ची खुर्ची आणि पैसाच हवा आहे. दारूच्या माध्यमातून १८ हजार कोटींचा महसूल मिळतो. तो निवडणुकीत पक्षाला दिला जातो. आज चहावाला पंतप्रधान झाला. उद्या दारूवाला पंतप्रधान होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वत:ला धर्म आणि संस्कृती रक्षक म्हणविणाºयांनी मानवता धर्म जपला पाहिजे. गत दहा वर्षात साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या झाल्या. तर दारूमुळे १० लाख आत्महत्या झाल्या. यानंतरही सरकार गंभीर नाही. अशा सरकारला धडा शिकविला पाहिजे. म्हणूनच मतदान करू नका, असा सल्ला पाटकर यांनी दारूबंदीची मागणी करणाºया महिलांना दिला.पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-गोस्वामीचंद्रपूर दारूबंदीच्या प्रणेत्या, श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी म्हणाल्या, दारुबंदीचा विषय गांभीर्याने न घेणारे पालकमंत्री मदन येरावार यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा द्यायला तयार नसतील तर मतदानाच्या माध्यमातून त्यांना घरी बसवा. तर विरोधकांनीही लेखी आश्वासन दिल्याखेरीज त्यांनाही मतदान करू नका. चंद्रपुरात दारूबंदी झाल्यानंतरही दारू विकली जाते, असा अपप्रचार होतो. त्याला बळी न पडता दारूबंदी करा. सर्वसामान्यांचे अच्छे दिन नाही. तर दारू, रेती, कोळसा ठेकेदाराचे अच्छे दिन आहेत. संपूर्ण विदर्भ दारूमुक्त व्हावा, असे मत त्यांनी मांडले.दारुबंदीची लढाई तीव्र करा- योगेंद्र यादवदिल्लीतील नेते, राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी दारूब्ांदी हा यवतमाळचाच नव्हेतर संपूर्ण देशाचाच प्रश्न असल्याचे मत व्यक्त केले. आयुष्यमान स्वस्थ भारत योजनेचा गाजावाजा होतो. याचवेळी सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळले जाते. त्यामुळे दारुबंदीची लढाई अधिक तीव्र करा, असे ते म्हणाले.नरेंद्र मोदींना खाली खेचा- प्रतिभा शिंदेजळगावातील जनसंघर्ष मार्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे म्हणाल्या, सरकार कंपन्यांचा फायदा करते आणि गरिबांना खाते. नरेंद्र मोदींची ५६ इंचाची छाती असेल तर संपूर्ण देशात दारूबंदी करून दाखवावी. मुख्यमंत्र्यांचा खरपूस समाचार घेत दारूबंदी न केल्यास खुर्चीचे पाय खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी केले.राष्ट्रवंदनेने दारूबंदीची शपथयावेळी स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार, मनिषा काटे, मराठा सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, हरिश इथापे, पुनमताई जाजू यांची भाषणे झाली. मुस्लिम महिलांनी कुराणातील दारूला विरोध असणाºया ओळी वाचून दाखविल्या.तर गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवंदना करून दारूबंदीची शपथ दिली. मोर्चाच्या वेळी झालेल्या सभेचे सूत्रसंचालन मनिषा काटे यांनी केले.येरावार नव्हे येडावार- पारोमितापालकमंत्री मदन येरावार जिल्ह्यात दारूबंदी करण्यास तयार नसतील, तर त्यांच्या घरावर मोर्चा न्या. हे येरावार नाही तर येडावार आहेत, अशा शब्दात पारोमिता गोस्वामी यांनी पालकमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली.

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरliquor banदारूबंदी