शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

समाजप्रेमींच्या दातृत्वावरच दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

यवतमाळातील धनगरसमाज, धनगर महिला संघर्ष समिती, ईनरव्हील क्लब, बाभूळगाव विकास मंच, स्वामिनी या संघटनांनी यावर्षीच्या दिवाळीत गोरगरीबांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी मोलाचा हात दिला.  मात्र अनेक कुटुंबापर्यंत संघटनांची मदत पोहोचू शकली नाही. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या तुलनेत समाजसेवी संघटनांची मदत अपुरी पडली. मात्र त्यांनी केलेला प्रयत्न माणुसकी जोपासणारा ठरला आहे.

ठळक मुद्देपालांमध्येही आनंदाचे दिवे; फाटक्या कापडांवरच बच्चेकंपनींचा निरागस उत्साह

  रूपेश उत्तरवार    लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदा दिवाळीत काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत दु:खीतांच्या कुटुंबात आनंद पसरविण्याचा प्रयत्न केला. वंचितांना कपडे, फराळाचे साहित्य, फटाके आणि इतर काही वस्तू दान केल्या. यवतमाळातील धनगरसमाज, धनगर महिला संघर्ष समिती, ईनरव्हील क्लब, बाभूळगाव विकास मंच, स्वामिनी या संघटनांनी यावर्षीच्या दिवाळीत गोरगरीबांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी मोलाचा हात दिला.  मात्र अनेक कुटुंबापर्यंत संघटनांची मदत पोहोचू शकली नाही. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या तुलनेत समाजसेवी संघटनांची मदत अपुरी पडली. मात्र त्यांनी केलेला प्रयत्न माणुसकी जोपासणारा ठरला आहे. यातून अनेक कुटुंबांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरल्याचे चित्र पहायला मिळाले. इतरांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच खरी दिवाळी असे म्हणत या संघटनांनी आपला सामाजिक उपक्रम जपला आहे. आता अनेक संघटनांनी या चांगल्या कार्यासाठी पुढे येण्याची नितांत गरज आहे. तरच समाजातील दुर्लक्षित घटक दिवाळीचा सण उत्साहाने साजरा करू शकणार आहे. अशा प्रकाराचा उपक्रम जिल्हाभरात आणि गावखेड्यांमध्ये झाला तर प्रकाश पर्वाचा खरा उद्देश सफल होण्यास मोलाची मदत मिळणार आहे. 

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिघडलीआम्ही सर्वजण रोजमजुरी करुन पोट भरतो. घरातील महिला मंडळी धुणे-भांडी करतात. यातून कुटुंबाचा गाडा चालतो. कोरोना काळात हातचा रोजगार गेला. यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णत: बिघडली. अशात दिवाळीचा सण तोंडावर आला. आमच्या कुटुंबाला ही मदत मिळाली नाही, मात्र ज्यांना मिळाली ते भाग्यवान आहे. सर्वांसाठी असे माणसे पुढे यावेत. झोपडीतील मुलांना हवा आकाश दिवा आपल्याही घरावर दिवाळीचा चमचमणारा दिवा प्रकाशित व्हावा, घरांमध्ये प्रत्येकांना नवे कपडे मिळावे, दररोज गोडधोड जेवायला मिळावे आणि आनंदाचे वातावरण सतत कायम रहावे असे कुटुंबातील प्रत्येकांना वाटते. ही मदत एका चमत्काराप्रमाणे कुटुंबाला मिळाली. याचा सर्वाधिक आनंद होता. 

इतरांचे फटाके पाहूण लुटला आनंदकाही कुटुंबांना मदत मिळाली तर अनेकांना ही मदत मिळाली नाही. इतरांनी फोडलेले फटाके पाहून या कुटुंबीयांनी आपला आनंद साजरा केला. आंब्याचे तोरण आणि झेंडूची फुले वाहून पूजा केली. 

मिळालेली मदतच ठरली जणू खरेदी  हातात पैसाच नसल्याने दिवाळीला काही खरेदी करताच आले नाही. कुणाकडून मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र काहींना मदत मिळाली तर अनेकांना ही मदत मिळाली नाही. आहे त्यातच समाधान मानून दिवाळीचा सण साजरा झाला. मोफत धान्य सर्वांना आधार देणारे ठरले. 

टॅग्स :Diwaliदिवाळी