शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २२ हजार पतसंस्थांचा लाभांश वाटपाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 15:37 IST

Yawatmal News राज्यातील २२ हजार पतसंस्थांच्या तीन कोटी सभासदांना तात्काळ लाभांश वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देतीन कोटी सभासदशासनाचा अध्यादेश पारित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पतसंस्थांना लाभांश वाटपाचा संचालक मंडळाला अधिकार देणारा अध्यादेश शासनाने पारित केला आहे. यामुळे राज्यातील २२ हजार पतसंस्थांच्या तीन कोटी सभासदांना तात्काळ लाभांश वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनच्या पाठपुराव्याचे हे फलित असल्याचे राज्य कार्याध्यक्ष राजुदास जाधव यांनी सांगितले.पतसंस्था आपल्या नफ्यातून वार्षिक आमसभेची मंजुरात घेऊन दरवर्षी सभासदांना लाभांश वाटप करतात. यावर्षी कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ३० सप्टेंबरपर्यंत बंधनकारक असणारी वार्षिक आमसभा होऊ शकली नाही. परिणामी शासनाने वार्षिक आमसभेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली.

कोरोना प्रादुर्भावामुळे वार्षिक आमसभा न झाल्याने लाभांश वाटपाचा मोठा प्रश्न पतसंस्थांसमोर निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर राज्या पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने वारंवार सहकार मंत्र्यांची भेट घेतली. लाभांश वाटपाचे अधिकार संचालक मंडळाला देण्यात यावे, ही मागणी रेटून धरली.

मंत्रिमंडळाच्या १४ ऑक्टोबरच्या बैठकीत सहकारी कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. कायद्यात सुधारणा असल्याने राज्यपालांच्या मंजुरीशिवाय अंमलबजावणी शक्यत नव्हती. राज्यापालांकडून लवकरात लवकर अध्यादेश निघावा यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनने प्रयत्न केले. अखेर २ नोव्हेंबर रोजी हा अध्यादेश पारित झाल्याने पतसंस्थांसमोरील एक मोठा प्रश्न मार्गी लागला. संचालक मंडळाला लाभांश मंजुरीचे अधिकार प्राप्त झाल्याने तात्काळ सभा घेऊन लाभांश वाटप सुरू होणार आहे. अध्यादेश पारित झाल्याने पतसंस्था फेडरेशनने समाधान व्यक्त केले.

टॅग्स :MONEYपैसा