शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दोन युवकांच्या खुनाने जिल्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:58 IST

घरात झोपून असलेल्या लहान भावाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करण्यात आला. ही घटना परसोडी(खुर्द) ता.कळंब येथे मंगळवारी सकाळी घडली. बाभूळगाव तालुक्याच्या कापरा बेड्यावरील युवकाचा मृतदेह गळ्यावर, तोंडावर जखमा असलेल्या स्थितीत आढळून आला.

ठळक मुद्देपरसोडीत धाकट्या भावाची हत्या : कापरा बेड्यातील युवकाचा गळा चिरुन खून

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब/बाभूळगाव : घरात झोपून असलेल्या लहान भावाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करण्यात आला. ही घटना परसोडी(खुर्द) ता.कळंब येथे मंगळवारी सकाळी घडली. बाभूळगाव तालुक्याच्या कापरा बेड्यावरील युवकाचा मृतदेह गळ्यावर, तोंडावर जखमा असलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनांमुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे.परसोडी(खुर्द) येथील किरण रमेश दिघडे (२८) याला मानेवर कुºहाडीचे घाव घालून ठार मारण्यात आले. घरात खाटेवर झोपून असताना सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याचा मोठा भाऊ प्रवीण उर्फ बाल्या रमेश दिघडे याने खून केला. कौटुंबिक कलहातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. प्रकरणी पोलीस पाटील सुरेश भगत यांनी तक्रार नोंदविली. यावरून कळंब पोलिसांनी बाल्या दिघडे याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनोद जांभुळे करीत आहे.बाभूळगाव तालुक्यात येत असलेल्या बेंबळा प्रकल्पाच्या गेटपासून ५० मीटर अंतरावरील मत्स्य बीज केंद्राजवळ पारधी समाजातील युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यावर, तोंडावर मोठ्या जखमा आढळल्या. त्याचा गळा चिरुन खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. नरेनसेठ बतावन पवार (३०) रा.कापरा पारधीबेडा असे मृताचे नाव आहे. तो सोमवारी घरून गेला होता. मंगळवारी सकाळी ६ वाजता मत्स्य बीज केंद्राजवळ त्याचा मृतदेह आढळला. नातेवाईकांनी त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून कापरा येथे नेला. याची माहिती पोलीस पाटील यांना मिळाली. त्यांनी मृतदेह बाभूळगाव येथे हलविण्यास सांगितले. यवतमाळ ग्रामीण व बाभूळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. नरेनसेठचा भाऊ नरेंद्रसिंग बतावन पवार याने घटनेची तक्रार पोलिसात दिली. या प्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ नुसार गुन्हा नोंदविला.बेंबळा धरणाजवळ दोघांवर हल्लाबाभूळगाव : बेंबळा धरणाजवळ दोघांवर एका समाजातील १५ ते २० लोकांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. रमेश बापूराव वाघाडे (५५) रा.कोपरा(जानकर) व देवानंद कोडापे (४०) रा.खडकसावंगा अशी जखमींची नावे आहेत. रमेश वाघाडे हे बेंबळा प्रकल्पाचे पाणी सोडण्याचे काम करतात. यासाठी दुचाकीने जात असताना एका समाजातील लोकांनी त्यांना अडविले. त्याचवेळी या परिसरात गुरे चारत असलेल्या देवानंद कोडापे याच्यावरही हल्ला केला. वाघाडे यांचा मोबाईल व रक्कम पळविली, तर त्यांची दुचाकी दगडाने फोडून टाकण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

टॅग्स :Murderखून