शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा शालेय कराटे स्पर्धा पोलीस संरक्षणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:27 IST

स्थानिक दोन संघटनेच्या वादामुळे शासनाच्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा पोलीस संरक्षणात व प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकाºयांच्या पूर्णवेळ उपस्थितीत घेण्यात आल्या.

ठळक मुद्देअमरावतीचे पंच : जिल्हा क्रीडा अधिकाºयांच्या उपस्थितीत पार पडले सामने, दोन संघटनांचा वाद

नीलेश भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक दोन संघटनेच्या वादामुळे शासनाच्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा पोलीस संरक्षणात व प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकाºयांच्या पूर्णवेळ उपस्थितीत घेण्यात आल्या. विभागीय नेहरू कप हॉकीनंतर कराटे या खेळातही परजिल्ह्यातील पंचाकडून ‘पंचगिरी’ करण्यात आली.जिल्ह्यात कराटे या खेळाच्या यवतमाळ डिस्ट्रीक्ट कराटे असोसिएशन व अ‍ॅमेचर कराटे डो असोसिएशन यवतमाळ अशा दोन संघटना आहेत. या दोनही संघटनेने शालेय स्पर्धेत तांत्रिक सहकार्य करण्याची परवानगी क्रीडा कार्यालयाला मागितली. उभय संघटनांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या वैधतेबाबत प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकाºयांना योग्यवेळी निर्णय न घेतल्याने कराटे स्पर्धा स्थगित कराव्या लागल्या. पुढे वाद विकोपाला जात असल्याचे पाहताच जिल्हा क्रीडा कार्यालयाने शालेय कराटे स्पर्धा स्वत:च्याच अधिपत्याखाली घेण्याचा निर्णय घेतला. तांत्रिक सहकार्य म्हणून अमरावती जिल्ह्यातील पंच आमंत्रित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.नेहरू स्टेडियम येथे १० व ११ आॅक्टोबर रोजी १४, १७, १९ वर्षे मुले-मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या. पहिल्या दिवशी स्पर्धेत दोनही संघटनेकडून कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलीस संरक्षणात स्पर्धा घेण्यात आल्या. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये हे पूर्णवेळ स्पर्धास्थळी उपस्थित होते. क्रीडा कार्यालयाने स्पर्धेसाठी खेळाडूंसोबत केवळ शारीरिक शिक्षकांनाच प्रवेश दिला.नियमानुसार ‘पंचगिरी’ नाहीजिल्हा क्रीडा कार्यालयाने शालेय कराटे स्पर्धेसाठी अमरावती जिल्ह्यातील पंच आमंत्रित केले होते. या पंचांनी वर्ल्ड कराटे फेडरेशन आणि भारतीय आॅलिम्पिक संघाची मान्यता असणाºया नियमावलीप्रमाणे पंचगिरी करणे अपेक्षित होते. मात्र या पंचांनी स्पर्धेत नियमावलीची पायमल्ली करीत निर्णय दिले. त्यामुळे जिल्ह्यातून राज्य, राष्ट्रीय पातळीवर जाणाºया कराटे खेळाडूंचे नुकसान झाल्याची तक्रार यवतामळ डिस्ट्रीक्ट कराटे असोसिएशनचे सचिव आनंद भुसारी यांनी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये यांना दिली. या तक्रारीने क्रीडा कार्यालयाने स्वत:च्याच अधिपत्याखाली आयोजित केलेली शालेय कराटे स्पर्धा वादाच्या भोवºयात अडकण्याची चिन्हे दिसत आहे.खेळाडूंनी फिरविली पाठशालेय कराटे स्पर्धेत दोन संघटनेचा वाद व स्पर्धेला मिळालेली स्थगिती या कारणामुळे जिल्ह्यातून ८० शालेय संघातील ८०० ते ९०० खेळाडूंची नोंदणी झालेल्या या स्पर्धेत केवळ ४५ खेळाडूंनी सहभाग घेतला. इतर खेळाडूंनी स्पर्धेकडे पाठ फिरविली.