शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

जिल्ह्याला मिळाले १२३ कोटी

By admin | Updated: January 13, 2015 23:08 IST

खरीप हंगामातील कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.

यवतमाळ : खरीप हंगामातील कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यास १२२ कोटी ८० लक्ष रुपये प्राप्त झाले असून सदर निधी या आठवड्यात तातडीने शेतकऱ्यांना वितरित करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या. पालकमंत्र्यांनी विश्राम भवन येथे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी १२२ कोटी ८० लाख रुपये प्राप्त झाले असून मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या ४ लाख ५० हजारांवर शेतकऱ्यांना सदर मदत या आठवड्याच्या शेवटपर्यंत वितरित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. २ हेक्टरपर्यंत प्रती हेक्टरी ४ हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे. प्रत्येक गावातील तलाठी कार्यालये व पोलीस ठाणे असलेल्या गावी पोलीस पाटील भवन बांधण्याचा एकत्रित कार्यक्रम राबविता येईल काय, यावर यावेळी विचार करण्यात आला.अतिक्रमण मोहिमेंतर्गत अनेक व्यावसायिकांची दुकाने हटविण्यात आली. अशा व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक ठिकाणी जागा निश्चित करावी, त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात करार तत्वावर गाळे काढून त्यांना वितरित करावी तसेच राज्यात काही ठिकाणी अशा अतिक्रमणधारकांचे कशा प्रकारे पुनर्वसन करण्यात आले आहे, त्याची माहिती घेण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. जिल्ह्यात दारिद्र्यरेषेच्या निकषात नसणाऱ्यांना यादीतून वगळून त्या ठिकाणी खऱ्या कुटुंबांना सामावून घेणे आवश्यक आहे. या बाबतीत अपिलात करणाऱ्या कार्डधारकांना निकष तपासून सामावून घेण्यात यावे. राजस्व अभियानाअंतर्गत पांदण रस्ते खुले करण्याचा धडक कार्यक्रम राबविण्यासोबतच जिल्हा वार्षीक योजनेतून शेतकऱ्यांसाठी अनुदान तत्त्वावर कुंपण याजना राबविता येईल काय याबाबत बैठकीत चर्चा झाली. वाळू धोरण, महसुली गावांना दर्जा, रिक्त पदे, वन जमीनीवरील लिज पट्टे, पूरसंरक्षक भिंती, कोंडवाडा बांधकाम आदींवरही यावेळी चर्चा झाली. (प्रतिनिधी)