शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
7
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
8
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
9
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
10
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
11
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
12
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
13
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
14
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
16
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
17
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
18
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जिल्ह्याला १९ लाख डोस हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 05:00 IST

आरोग्य विभागाने लसीकरणासाठी २६७ केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्राची दर दिवसाची क्षमता ५० हजार नागरिकांना लसीकरण करता येईल, इतकी मोठी आहे. त्या क्षमतेनुसार आतापर्यंत फक्त एकच वेळा ५५ हजार लस जिल्ह्याला मिळाली. त्यात एकाच दिवशी ४३ हजार लसीकरण करण्यात आले. त्यावेळी जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात आता लस येत नाही.

ठळक मुद्देरोजची गरज ५० हजार, आठवड्यात येतात १२ हजार डोस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पंतप्रधानापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत प्रत्येक जण सांगत आहे. जाणीव जागृती केली जात आहे. कोरोनाला रोखणारे हत्यार म्हणजे लसीकरणच आहे. यासाठी लसीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे, असे असतानाही लस उपलब्ध होण्याचे प्रमाण मात्र नगण्य आहे. केंद्र आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या निकषानुसार असणाऱ्या वयोगटाला १९ लाख डोसची नितांत आवश्यकता आहे. मात्र, डोस उपलब्ध होणे अवघड झाले आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांपुढे पेच निर्माण झाला आहे.ऑगस्ट अथवा पुढील काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट पसरण्याचा धोका आरोग्य विभागाने वर्तविला आहे. तत्पूर्वी हे संपूर्ण लसीकरण होणे आवश्यक आहे. त्याकरिता विविध कंपन्यांच्या लस बाजारात येणार असल्याचा कार्यक्रमही जाहीर झाला होता. मात्र, अजून तरी कोरोनाच्या लस पाहिजे त्या प्रमाणात बाहेर आल्याच नाहीत. यामुळे अडचणीत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाला मिळणारी लस लोकसंखेच्या प्रमाणात जिल्ह्यांना वितरित होत आहे. यात किती लस मिळेल, हे सांगणे अवघड आहे.आरोग्य विभागाने लसीकरणासाठी २६७ केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्राची दर दिवसाची क्षमता ५० हजार नागरिकांना लसीकरण करता येईल, इतकी मोठी आहे. त्या क्षमतेनुसार आतापर्यंत फक्त एकच वेळा ५५ हजार लस जिल्ह्याला मिळाली. त्यात एकाच दिवशी ४३ हजार लसीकरण करण्यात आले. त्यावेळी जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात आता लस येत नाही. आठ दिवसाला २० ते ३० हजार लस येत आहेत. गत सात महिन्यांत जिल्ह्यात सात लाख २५ हजार ८१८ डोस उपलब्ध झाले आहेत. प्रारंभी मे ते जूनमध्ये १८ ते ४४ वयोगटांतील २३ हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले. आता १८ ते ४४ वयोगटांत एक लाख ४२ हजार १५ नागरिकांना  पहिला डोस मिळाला, तर १० हजार ७०५ नागरिकांना दुसरा डोस घेतला.

गरोदर मातांसाठी कॅम्पेनिंग- ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातून गरोदर मातांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, याशिवाय स्तनदा मातांना कोरोनाची लस दिली जात आहे.

लसीकरणात सर्वच प्रवर्गातील नागरिक पुढे येत आहेत. गरोदर मातांच्या लसीकरणाला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातून ही लस दिली जाणार आहे. गरोदर महिलासाठी ही लस सुरक्षित आहे.       - डॉ.सुहास कोरे, लसीकरण विभाग प्रमुख

लसीकरणात तृतीय पंथीयांचा समावेश- जिल्ह्यात इतर प्रवर्गाच्या लसीकरणात २७० नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये काही तृतीयपंथीयांनी लसीकरण पूर्ण केले आहे. सर्वांसाठी लसीकरण खुले करण्यात आले आहे. त्याचा लाभ होत आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या