शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

जिल्ह्यात २१ लाख ७२ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST

२०१४ मध्ये सात विधानसभा क्षेत्रामध्ये २० लाख २५ हजार ८४३ मतदारांची नोंद करण्यात आली. ३१ आॅगस्टच्या अंतिम मतदार यादीत २१ लाख ७२ हजार १७४ मतदारांची नोंद करण्यात आली. गत पाच वर्षात एक लाख ४६ हजार ३३१ मतदार जिल्ह्यात वाढले आहेत.

ठळक मुद्देसात विधानसभा : दीड लाख मतदार वाढले

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. निवडणूक विभागाने ३१ आॅगस्टला मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली. या मतदार यादीनुसार जिल्ह्यात २१ लाख ७२ हजार १७४ मतदार विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. सन २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये एक लाख ४६ हजार ३३१ मतदार वाढले आहे. हे मतदार सात आमदारांची निवड करणार आहे.विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची पूर्वप्रक्रिया सुरू केली आहे. मतदारांची नावे नोंदविण्याचे काम निवडणूक विभागाने पूर्ण केले. यावर आक्षेपही मागविण्यात आले. त्यानुसार मतदार यादीमध्ये दुरूस्त्याही करण्यात आल्या.२०१४ मध्ये सात विधानसभा क्षेत्रामध्ये २० लाख २५ हजार ८४३ मतदारांची नोंद करण्यात आली. ३१ आॅगस्टच्या अंतिम मतदार यादीत २१ लाख ७२ हजार १७४ मतदारांची नोंद करण्यात आली. गत पाच वर्षात एक लाख ४६ हजार ३३१ मतदार जिल्ह्यात वाढले आहेत. यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वाधिक एक लाख ९५ हजार ९७९ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ८८ हजार १३९ महिला मतदार आहेत. वणी विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ४७ हजार ५५२ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ३६ हजार ९४५ महिला मतदार आहेत.राळेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ४५ हजार १६० पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ३८ हजार २९ महिला मतदार आहेत. दिग्रस विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ६७ हजार ६८० पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ५४ हजार ६७३ महिला मतदार आहेत.आर्णी विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ६० हजार ८२९ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ५१ हजार १६४ महिला मतदार आहेत. पुसद विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ५४ हजार ३३४ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ३८ हजार ८२२ महिला मतदार आहेत. उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ५३ हजार ५१८ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ३९ हजार ३५० महिला मतदार आहेत.३१ तृतीयपंथी मतदारांची नोंदजिल्ह्यात ३१ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २१ तृतीयपंथी मतदारांची नोंद यवतमाळमध्ये करण्यात आली आहे. वणी विधानसभा क्षेत्रात तृतीयपंथी मतदारांची नोंद निरंक आहेत. इतर मतदान केंद्रावर १० तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे.सहा मतदान केंद्र वाढविण्याचा प्रस्तावविधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांच्या आधारावर मतदान केंद्राची निर्मिती करावी लागते. या निकषानुसार सहा मतदान केंद्र वाढविण्याचा प्रस्ताव निवडणूक विभागाकडे आला आहे. या व्यतिरिक्त २ हजार ४९१ मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. त्याकरिता २ हजार ४९१ मतदान यंत्रे लागणार आहेत.

टॅग्स :Votingमतदान