शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

पीक कापणीसाठी जिल्हाधिकारी प्रत्यक्ष शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:27 IST

हंगामात नेमके किती उत्पादन होणार, याचा अंदाज बांधण्यासाठी पीक कापणी प्रयोग केला जातो. ही प्रक्रिया पूर्वी चावडीत बसूनच पूर्ण केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही पीक विमा व शासकीय मदतीला मुकावे लागत होते.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या इतिहासातील पहिलाच प्रयोग : उपविभागीय अधिकारी-तहसीलदारांनाही पाठविणार शेतशिवारात

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : हंगामात नेमके किती उत्पादन होणार, याचा अंदाज बांधण्यासाठी पीक कापणी प्रयोग केला जातो. ही प्रक्रिया पूर्वी चावडीत बसूनच पूर्ण केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही पीक विमा व शासकीय मदतीला मुकावे लागत होते. हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी स्वत: शेतात जाऊन पीक कापणी प्रयोग केला. यावेळी महसूल व कृषी यंत्रणेचे सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते.दारव्हा तालुक्यातील उजोणा येथील शेतकरी शशीधर उकंडा जाधव यांच्या शेत सर्व्हे नंबर ५५ मध्ये मुगाची पीक कापणी केली. उत्पादनाचा अंदाज ठरविण्यासाठी प्रत्येक गावात पीक कापणी समिती आहे. हा कार्यक्रम महसूल व कृषी विभाग संयुक्तपणे राबवितो. मात्र या समित्यांमधील प्रशासकीय यंत्रणा काम प्रामाणिकपणे करत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना उत्पादन कमी होऊनही मदतीपासून वंचित राहावे लागत होते. चुकीच्या पीक कापणीतून पैसेवारीचे गणित चुकत होते.याला आळा घालण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी स्वत: मूग पिकाचा कापणी प्रयोग करण्यासाठी शेतात गेले. त्यांच्यासोबत अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी नागनाथ कोपळकर उपस्थित होते. मुगाच्या शेंगाची तोडणी करून त्याचे वजन करण्यात आले. सरासरी उत्पन्नाचे निकष ठरले आहेत. जिल्हाधिकाºयांनी केलेल्या कापणी प्रयोगात मुगाचे यावर्षी सरासरी इतके उत्पन्न होईल, असे प्राथमिक स्वरूपात स्पष्ट झाले. मात्र अंतिम पैसेवारीतून उत्पन्नाचे चित्र स्पष्ट होणार आहे.अधिकाऱ्यांना निर्देशजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: पीक कापणी प्रयोग करून यंत्रणेला कृतीयुक्त इशारा दिला. त्यासोबतच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांनीही शक्य होईल तितक्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती